Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सुनीता विल्यम्स या तिसऱ्यांदा अवकाशात

  • Home
  • Current Affairs
  • सुनीता विल्यम्स या तिसऱ्यांदा अवकाशात
  • भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 5 जून रोजी तिसऱ्यांदा अवकाशात भरारी मारली.
  • बोइंग स्टारलायनरच्या यानातून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (आयएसएस) पोहोचणाऱ्या त्या पहिल्या अंतराळवीर आहेत.
  • अंतराळवीरांना ‘आयएसएस’वर पोहोचवणे आणि परत पृथ्वीवर आणण्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या खासगी मानवी अंतराळ मोहिमांसाठी हे प्रक्षेपण म्हणजे यशाचा मोठा टप्पा गाठण्यासारखे आहे.
  • ‘ए युनायटेड लाँच अलायन्स अॅटलास-व्ही या प्रक्षेपकाच्या मदतीने यानाने फ्लोरिडातील केनेडी अवकाश केंद्रातून भारतीय वेळेनुसार बुधवारी (5 जून)8 वाजून 22 मिनिटांनी उड्डाण केले.
  • या यानात सुनीता विल्यम्स यांच्यासह बूच विल्मोर हे अंतराळवीर (ता.६ जून) रात्री पावणेदहाच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) ‘आयएसएस’ वर पोहोचणार आहेत.
  • याआधी 7 मे रोजी यानाच्या ऑक्सिजन व्हॉल्व्हमध्ये आणि 1 जूनला तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण थांबविण्यात आले होते.
  • सुनीता विल्यम्सने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून ‘ट्रायथलॉन’मध्ये सहभागी होऊन विक्रम नोंदवला होता.
  • याशिवाय, 2007मध्ये अवकाश स्थानकातून बोस्टन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *