Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘सुपर हर्क्युलस’चे पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी लँडिंग

कारगिल मधील पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेजवळील हवाई तळावर भारतीय हवाई दलाने ‘सी- 130 जे सुपर हर्क्युलस’ या अवाढव्य मालवाहू विमानाचे रात्रीच्या वेळी सुरक्षित लँडिंग करून दाखवले आहे. हवाई दलाची विशेष तुकडी असलेल्या ‘गरुड’ कमांडोंनी नुकतीची कामगिरी करून दाखवली.

अधिक माहिती
● रात्रीच्यावेळी कारगिल येथील 10 हजार 500 फूट उंचावरील धावपट्टीवर मालवाहू विमानाचे रात्रीच्या यावेळी यशस्वी लँडिंग करून देशाची हवाई सामर्थ्य वाढत असल्याचे भारतीय वायुदलाने पुन्हा सिद्ध केले.
● इतिहासात पहिल्यांदाच कारगिल सारख्या उंचावरील धावपट्टीवर हवाई दलाचे मालवाहू विमान रात्रीच्या वेळी उतरविण्यात आले आहे.
● संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देशाच्या सीमारेषांवरील हवाई तळांवरील पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

‘सुपर हर्क्युलस’ ची वैशिष्ट्ये
● निर्मिती कंपनी : लॉकहिड मार्टिन
● लष्करी वाहतूक विमानाचे अत्याधुनिक आवृत्ती
● तीव्र वातावरणातही उड्डानास सक्षम
● 20,000 किलो वजनासह 26 हजार फूट उंची गाठू शकते .
● वेग : प्रति तास 410 मैल

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *