मुलांमध्ये विज्ञानाची गोडी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना सृजनशीलता दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ‘राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन’ दरवर्षी आयोजित करण्यात येते. यावर्षीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने या प्रदर्शनाच्या आयोजनाचा मान पुणे या शहराला मिळाला आहे.
• हे प्रदर्शन बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलनात 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
• राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेवर देण्यात आली आहे.
• मागच्या वर्षी हे प्रदर्शन आसाम मधील गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आले होते.
• राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
• विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 400 विद्यार्थी, 200 शिक्षक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
• या प्रदर्शनासाठी राज्य शासनाकडून चार कोटी 91 लाख ,तर एनसीईआरटी कडून 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.