अॅम्ब्रॉस आणि रूव्हकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल
- अमेरिकेच्याव्हिक्टर अॅम्ब्रॉस आणि गॅरी रूव्हकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल सन्मान जाहीर झाला.
- ‘मायक्रो- आरएनए’च्याशोधासाठी त्यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. ‘मायक्रो- आरएनए’ हे जनुकांच्या क्रियाशीलतेच्या नियमनासंबंधीचे मूलभूत तत्त्व मांडते.
- विविध अवयवांचा विकास कसा होतो आणि ते कार्य कशा पद्धतीने करतात ते याद्वारे कळते.
- अम्ब्रॉस यांनी हार्वर्ड विद्यापीठात संशोधन केले. सध्या ते ‘मॅसॅच्युसेट्स मेडिकल स्कूल’ विद्यापीठात ‘नॅचरल सायन्स’चे प्राध्यापक आहेत.
- रूव्हकून यांनी मॅसॅच्युसेट्स सरकारी रुग्णालय आणि ‘हार्वर्ड मेडिकल स्कुल मध्ये संशोधन केले.’हार्वर्ड मेडिकल स्कूल’मध्ये ते सध्या नुकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
- पुरस्कारार्थांना11 लाख स्वीडिश क्रोनोर (10 लाख अमेरिकी डॉलर) प्राप्त होतील. स्वीडनच्या आल्फ्रेड नोबेल यांच्या नावे 1901 पासून हा पुरस्कार दिला जातो.
- 2023 मध्येवैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हंगेरी-अमेरिकी कॅटॅलिन कारिको आणि अमेरिकी ड्र्यू वेसमन यांना जाहीर झाले होते. कोव्हिड-19 विरोधात ‘एम-आरएनए’ लस तयार करण्यास चालना देणारे संशोधन केल्याबद्दल त्यांचा सन्मान झाला होता.
- वैद्यकशास्त्रातील संशोधनासाठी आतापर्यंत 114 वेळा नोबेल जाहीर झाले असून एकूण 227 जणांना प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये 13 महिलांचा समावेश आहे.
नेमके संशोधन काय?
- बहुपेशीयसजीवांच्या पेशींमध्ये डीएनए असतो.
- याडीएनएमध्ये असलेल्या जनुकांमध्ये शरीराच्या विविध प्रक्रियांसाठी आवश्यक माहिती साठवलेली असते.
- डीएनएकडूनही माहिती मेसेंजर आरएनएकडे (एमआरएनए) पाठवली जाते. एमआरएनएकडून मिळालेल्या माहितीनुसार पेशी ठरावीक प्रथिने तयार करतात.
- मायक्रोआरएनए हे सूक्ष्म रेणू व एमआरएनएच्या काही भागांना जोडले जाऊन त्यांचे कार्य रोखतात. त्यामुळे ठरावीक जनुकांची माहिती संक्रमित होऊन पेशींमध्ये ठराविक प्रथिनेच तयार होतात.
- मानवीशरीराचा विचार करायचा झाल्यास प्रकाशाची संवेदना ओळखणाऱ्या डोळ्यातील पेशी, त्वचेच्या पेशी, जठर किंवा किडनीच्या पेशी यांची रचना आणि कार्य निराळे असते. ठरावीक प्रथिनांच्या साह्यानेच या पेशी किंवा उती तयार होऊ शकतात.
- अवयवांच्यापेशींचे वेगळेपण राहण्यात मायक्रो आरएनए महत्त्वाची भूमिका बजावतात.
- मायक्रोआरएनएने आपले काम व्यवस्थित पार पाडले नाही, तर पेशींमध्ये असामान्य स्थिती तयार होऊन कॅन्सर होऊ शकतो. केस गळती, हाडांच्या व्याधी, त्वचारोगही मायक्रो आरएनएतील बिघाडामुळे होऊ शकतात.
जागतिक डिस्लेक्सिया दिन
- जागतिकडिस्लेक्सिया दिन दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी पाळला जातो.
- डिस्लेक्सियाहा एक शिकण्यात अडचण असलेला सामान्य विकार आहे, हा विकार एखाद्या व्यक्तीच्या योग्यरितीने वाचण्याच्या आणि लिहिण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो.
- ज्यांनाडिस्लेक्सिया आहे त्यांच्यासाठी अस्खलितपणे वाचन करणे आणि लिहिणे यासारखी कौशल्ये ही आव्हाने आहेत.
- डिस्लेक्सियाअसलेल्या व्यक्ती अनेकदा अचूकपणे पटकन वाचू अथवा लिहू शकत नाहीत. डिस्लेक्सिया असलेल्या व्यक्तींना वाचन, लेखन, शब्दसंग्रह आणि हात आणि डोळ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी आवश्यक कार्यांमध्ये संघर्ष करावा लागतो.
- यासमस्यांबद्दल आणि अशा विकाराचे व्यवस्थापन करण्यासाठी काय केले जाऊ शकते, याबद्दल जागतिक डिस्लेक्सिया दिनी जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.
- सर्वसमावेशकतेलाचालना , शिक्षणाच्या संधी आणि डिस्लेक्सिया असलेल्या व्यक्तींना त्यांच्या शिकण्याच्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी प्रभावी धोरणांची अंमलबजावणी करणे ही या दिनाची उद्दिष्टे आहेत.
- भारतसरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग हा देशातील दिव्या ग व्यक्तींच्या सर्व विकास कार्यक्रमांवर लक्ष ठेवणारा नोडल विभाग आहे.
- याविभागाच्यावतीने 8 ऑक्टोबर 2023 रोजी जागतिक डिस्लेक्सिया दिनाचे औचित्य साधून लोकांमध्ये डिस्लेक्सियाबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून, त्याच्याशी संबंधित संस्थांमार्फत देशभरात विविध कार्यक्रम करण्यात आले.
जागतिक ऑक्टोपस दिन
- ऑक्टोपसम्हणजेच आठ पाय म्हणून 8 ऑक्टोबर त्याचा दिवस.
- याच्या289 प्रजाती असून पायाच्या खालच्या बाजूच्या चूषक कपाच्या साहाय्याने त्याला खडबडीत, गुळगुळीत पृष्ठभागाचे ज्ञान होते.
- याचे मोठे फुगीर डोके बिळबिळीत असते. त्यामुळे कोणत्याही सांदी-कोपऱ्यातून तो आपले अंग आत-बाहेर काढू शकतो.
- निळय़ारक्ताच्या ऑक्टोपसमध्ये ‘हिमोसायनीन’ हे श्वसन-रंगद्रव्य असते.
- ऑक्टोपसचीदृष्टी अत्यंत उत्तम असून गढूळ पाण्यातही चांगले दिसते.
- ऑक्टोपसअत्यंत बुद्धिमान अपृष्ठवंशीय प्राणी समजला जातो.
- शोभेच्याटाकीतून पलायन करणे, बाटल्यांची झाकणे उघडणे, नारळाच्या करवंटीचा हत्यारासारखा उपयोग करणे, अशा करामती ऑक्टोपस करतात.
- शत्रूसमीप आल्यावर जोराने शाईचा फवारा मारणे आणि शत्रू बावचळला असता पळ काढणे हे ऑक्टोपसचे वैशिष्टय़ आहे.
- रंगबदलता येत असल्याने आजूबाजूच्या परिसरात छद्मावरण संकल्पनेने मिसळून जाणे यांना चांगले जमते.
- ते अतिवेगाने पोहू शकतात. तसेच छोटय़ा भक्ष्यांची शिकार करतात.
- सर्वातमोठा ऑक्टोपस 5 मीटर लांब व 5 किलोग्रॅम वजनाचा असून तो प्रशांत महासागरात आढळतो.
- तरसर्वात छोटी प्रजाती (वुल्फी) जेमतेम २.५ सेंमी लांबीची असते.
8 ऑक्टोबर : वायू सेना दिन
- भारताच्यासंरक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या वैमानिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो.
- 2024 मध्ये92 वा वायुसेना दिन साजरा केला जात आहे.
- भारतीयहवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे हवाई दल आहे, ज्याचे मुख्य उद्दिष्ट भारताच्या अखंडतेसाठी आणि अस्मितेसाठी भारतीय सीमेवरील आकाश सुरक्षित करणे आहे. भारतीय हवाई दलाला केवळ युद्धादरम्यानच नव्हे तर कोणत्याही संभाव्य हल्ल्यापासून भारतीय राष्ट्राचे रक्षण करावे लागते.
- 8 ऑक्टोबर1932 रोजी भारतीय वायुसेनेच्या अधिकृत स्थापनेसाठी भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो.
- यादिवसाचा अधिकृत उत्सव त्याच दिवशी सुरू झाला. भारतीय हवाई दल (IAF) कडे भारतीय हवाई क्षेत्र सुरक्षित ठेवण्याची तसेच इतर अनेक ऑपरेशन्स करण्याची प्राथमिक जबाबदारी आहे.
- भारतीयवायुसेना ही भारतीय सशस्त्र दलांची वायुसेना आहे जी सुरक्षा राखण्यात आणि देशाने लढलेल्या युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका जावते.
- भारतीयहवाई क्षेत्र सुरक्षित करणे आणि हवाई संचालन करणे हे त्याचे प्राथमिक ध्येय आहे.
सुहासिनी जोशी यांना विष्णुदास भावे गौरवपदक
- अभिनयक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी उर्फ सुहास जोशी यांना 2024 चा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर करण्यात आले आहे .
- अखिलमहाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी ही घोषणा केली.
- मराठीनाट्य क्षेत्रातील विष्णुदास गौरव पदक हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार समजला जातो.
- गौरवपदक आणि रोख रक्कम पंचवीस हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- 5 नोव्हेंबररोजी या रंगभूमी दिनी या पुरस्काराची वितरण केले जाणार आहे .
- ज्येष्ठअभिनेत्री सुहास जोशी यांनी गेली अनेक वर्ष रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात चतुरस्त्र अभिनयाचे दर्शन घडवले आहे .
- अनेकमराठी नाटके, मराठी -हिंदी चित्रपट तसेच मराठी आणि हिंदी मालिका त्यांच्या अभिनयाने लक्षवेधी ठरलेले आहेत .
- अभिनयकलेतील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना झी गौरव ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, फिल्म फेयर ,नाट्य दर्पण आणि मराठी ग्रंथ संग्रहालय व्हिडिओकॉन स्क्रीन पुरस्कार, सह्याद्री नवरत्न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- याशिवायविविध संस्थांतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- आनंदीगोपाल, नटसम्राट, डॉक्टर तुम्हीसुद्धा, प्रेमा तुझा रंग कसा, स्मृती चित्रे ,अग्निपंख ही त्यांची काही गाजलेली नाटके आहेत .
- तर, तूतिथे मी, आनंदी आनंद, मुंबई पुणे मुंबई असे अनेक चित्रपट त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज केले आहेत .
- अनेकमराठी- हिंदी दूरदर्शन मालिकांमध्ये काम केलेला आहे.
- तसेचअनेक वर्ष ते लहान मुलांसाठी नाट्य प्रशिक्षण वर्गाचे संचालन करीत आहेत
दीपा कर्माकरची निवृत्ती
- भारताचीऑलिम्पिक जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकरने कारकीर्दीमधील अनेक चढ-उतार – पाहिल्यानंतर अखेर निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
- ऑलिम्पिकसाठीपात्र ठरलेली दीपा भारताची पहिली जिम्नॅस्टिक्सपटू ठरली होती.
- पदार्पणाच्या2016 ऑलिम्पिक स्पर्धेतच दीपाने अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली होती. मात्र, आवडत्या व्हॉल्ट प्रकारात केवळ15 गुणांनी तिला ऑलिम्पिक कांस्यपदकापासून वंचित राहावे लागले होते. दीपा चौथ्या स्थानावर राहिली.
- जिम्नॅस्टिक्सपटूघडण्यासाठी असलेल्या नैसर्गिक आव्हानावर मात करून नेटाने उभी राहिल्यानंतर दीपाने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते.
- आंतरराष्ट्रीयस्तरावर पदक मिळवणारी ती भारताची पहिली जिम्नॅस्टिक्सपटू होती.
- पायाला झालेली दुखापत, त्यावर करावी लागलेली शस्त्रक्रिया आणि उत्तेजक सेवन प्रकरणात स्वीकारावी लागलेली बंदी यामुळे दीपाच्या कामगिरीवर परिणाम झाला.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी
- जागतिकस्पर्धा – एक सुवर्ण, एक कांस्य
- राष्ट्रकुलस्पर्धा – कांस्यपदक
- आशियाईअजिंक्यपद – एक सुवर्ण, एक कांस्य
दीप कर्माकरचा गौरव
- अर्जुनपुरस्कार (2015)
- मेजर ध्यानचंद खेलरत्न (2016)
- पद्मश्री(2017)
- दीपाकर्माकर जन्म : 9 ऑगस्ट 1993 आगरतळा , त्रिपुरा



