‘सौर कृषी वाहिनी‘ला दोन राष्ट्रीय पुरस्कार
- राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना0 च्या अंमलबजावणीत माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल महावितरणला गव्हर्नन्स नाऊ या संस्थेच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित अकराव्या सार्वजनिक उद्योग पुरस्कार सोहळ्यात दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले.
- महावितरणला ‘एक्सलन्स इन प्रोसेस इनोव्हेशन’ आणि ‘बेस्ट यूज ऑफ ऑटोमेशन अँड डिजिटल टेक्नॉलॉजीज’ दोन गटांत सर्वोत्कृष्ट कामगिरीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.