नाविन्यपूर्ण संकल्पना आणि कृषी, उद्योग, विविध प्रकारच्या उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात सुरू असलेले स्टार्टअप हे देशात अव्वल ठरत आहे. नोंदणीसाठी देशात तब्बल 18% तर, यशस्वी स्टार्टअपमध्ये राज्याचे एकूण 23% योगदान असल्याने राज्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 1 लाख 54 हजार 449 हून अधिक रोजगार उपलब्ध झाला आहे.
अधिक माहिती
● राज्यात महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण-2018 हे सुरू असून त्यासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले आहे.
● आत्तापर्यंत केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाकडे राज्यातील मान्यताप्राप्त 16 हजार 145 स्टार्टअपची नोंद झाली.
● 108 पैकी 25 स्टार्टअप हे महाराष्ट्रात आहेत.
● राज्यातील 36 जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे स्टार्टअपबाबत मोठी अनजागृती होत आहे.
● राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये तब्बल 49 हजार 821 स्टार्टअपची नोंदणी झाली.
● पहिल्या रँकचा राजीव गांधी एक्सलन्स अवॉर्ड 2021-22, निती आयोगाकडून नॅशनल इनोवेशन इंडेक्सचा चौथ्या रँकचा पुरस्कारही राज्याला मिळाला आहे.