राज्य शासनाच्या पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या (स्पर्धा परीक्षा समिती) अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.