Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

स्लीनेक्स-25 नौदल सराव Slinex-25 naval exercise

Slinex-25 naval exercise

● भारतीय नौदलाची आयएनएस राणा (क्षेपणास्त्र विनाशिका) आणि आयएनएस ज्योती (फ्लीट टँकर) ही जहाजे स्लीनेक्स-25 या श्रीलंका-भारत नौदल सरावाच्या 12 व्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी कोलंबो येथे दाखल.
● हा सराव 14 ते 18 ऑगस्ट 2025 या कालावधीत होत आहे.
● 2005 मध्ये सुरू झालेला स्लीनेक्स हा द्विपक्षीय नौदल सराव गेल्या दोन दशकांपासून दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य अधिक मजबूत करत आहे.
● आंतर-परिचालनक्षमता, सागरी सहकार्य वाढवणे आणि विविध सागरी कारवाया संयुक्तपणे करताना सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे हा या सरावाचा उद्देश आहे.
● स्लीनेक्स या युद्धसरावाची मागील आवृत्ती 17 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान भारतात विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली होती.
● स्लीनेक्स हा द्विपक्षीय नौदल सराव 2005 मध्ये दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य आणि आंतरकार्यक्षमता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आला होता.
● 14 ते 16 ऑगस्ट 2025 या काळात कोलंबो येथे हार्बर फेज (बंदर टप्पा), त्यानंतर 17 ते 18 ऑगस्ट 2025 या काळात सी फेज (समुद्री टप्पा) अशा दोन टप्प्यांत या सरावाचे आयोजन करण्यात येणार.
● श्रीलंकेच्या नौदलाचे प्रतिनिधित्व SLNS गजबाहु आणि SLNS विजयबाहु (दोन्ही प्रगत ऑफशोअर गस्ती नौका) करतील आणि दोन्ही नौदलांची विशेष दलेही या सरावात सहभागी होतील.
● स्लीनेक्स सागरी सराव हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील सखोल सहकारी संबंधांचे प्रतीक आहे, ज्याने ‘महासागर’ (Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) या भारताच्या धोरणानुसार सागरी क्षेत्रात सहकार्य अधिक मजबूत केले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *