केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी 22 जुलै रोजी ग्रामीण वॉश (पाणी, निकोप आरोग्यासाठी खबरदारी, स्वछता) सहकार्य मंचाच्या (आरडब्लूपीएफ) दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत, हागणदारी मुक्तीसाठीच्या 75 ओडीएफ प्लस सर्वोत्तम पद्धतींच्या संग्रहाचे प्रकाशन केले.
स्वछता क्रॉनिकल्स: ट्रान्सफॉर्मेटिव्ह टेल्स फ्रॉम इंडिया अर्थात ‘स्वच्छता यशोगाथा : भारतातील परिवर्तनवादी कथा’ या शीर्षकाखाली प्रकाशित हा संग्रह, स्वच्छ भारत अभियान -ग्रामीणच्या टप्पा -II च्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी विविध ओडीएफ प्लस उपक्रमांमध्ये नवनवीन शोध, अडथळे दूर करण्यासाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजना, विशेष मोहिमा आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रयत्न समोर आणतो.“ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त करण्यासाठी काम करणाऱ्या राज्यांसाठी आणि इतर हितसंबंधितांसाठी यशोगाथांचा हा संग्रह एक बहुमूल्य स्रोत आहे”.हा संग्रह, स्वच्छ भारत अभियान – ग्रामीण’च्या माहिती, शिक्षण संपर्क विषयक चमूने विकसित केला आहे आणि स्वच्छ भारत अभियान – ग्रामीण टप्पा – II च्या प्रत्येक विषयावरील स्तंभावर आधारित कथांचा त्यात समावेश आहे.
या संग्रहातील कथांची निवड खालील प्रमुख निकषांवर आधारित आहे:
1)नवोन्मेष : हा विभाग ओडीएफ प्लस मिळविण्यासाठी अंमलात आणलेल्या नाविन्यपूर्ण पद्धती अधोरेखित करतो.
उदाहरणार्थ, ओडीशा राज्यात तालुका स्तरावरील समुदायाचा सहभाग आणि नेतृत्वाच्या माध्यमातून खोरधा जिल्ह्यातील भिंगारपूर ग्रामपंचायती मधील जितिकर सुआनलो गावाच्या ओडीएफ प्लस आदर्श गावाचा दर्जा कशाप्रकारे सुनिश्चित केला किंवा ओडीएफ प्लस गुणधर्मांचे लाइव्ह मॉडेल्स (घन आणि द्रव कचरा प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी) प्रदर्शित केल्याने उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्याला ओडीएफ प्लस दर्जा मिळवण्यात कशाप्रकारे मदत झाली, याबाबत माहिती देण्यात आली आहे.
2)अडथळ्यांवर मात करणे:
या विभागात ओडीएफ प्लस दर्जा मिळवण्यासाठी ज्या आव्हानांना सामोरे जावे लागले आणि या आव्हानांवर मात कशाप्रकारे मात करण्यात आली, याबद्दल चर्चा केली आहे.
उदाहरणार्थ, तामिळनाडू राज्याने नम्मा ओरू सुपारू मोहिमेचा एक भाग म्हणून नाविन्यपूर्ण सामूहिक स्वच्छता उपक्रमाद्वारे मदुराईच्या उपनगरीय पंचायतींमधील घनकचरा व्यवस्थापनाच्या महत्त्वपूर्ण आव्हानावर मात केली.
3)जागरुकता वाढवणे : स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांवर हा विभाग प्रकाश टाकतो.
उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील मुले वॉश वाणी नावाच्या नियतकालिकाद्वारे ग्रामीण भागात सकारात्मक वॉश म्हणजेच पाणी, निकोप आरोग्यासाठी घ्यायची खबरदारी आणि स्वच्छतेला पुरक वर्तनाला चालना देण्यासाठी त्यांच्या सर्जनशील ऊर्जेचा वापर करत आहेत.
4)विशेष मोहीम :
हा विभाग ओडीएफ प्लस मिळविण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमांची चर्चा करतो.
उदाहरणार्थ, गुजरात राज्याने स्वच्छ सागर, सुरक्षित सागर (स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र) मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांचे किनारे नियमितपणे स्वच्छ करण्यासाठी आणि त्याद्वारे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या.


