स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारात महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला यामध्ये पश्चिम महाराष्ट्र ने बाजी मारली आहे. नवी मुंबई हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे तर पुणे दहाव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरले आहे.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य विभागाच्या वतीने 2023 मध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.
अधिक माहिती
● राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील भारत मंडपम मध्ये झालेल्या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
● स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे संचालक नवनाथ वाठ हे आहेत.
● महाराष्ट्राच्या वतीने नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के. एच. गोविंदराज यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
● स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला पहिल्यांदाच प्रथम क्रमांक मिळाला आहे.
● मागच्या वर्षी हा पुरस्कार मध्य प्रदेश या राज्याने पटकावला होता.
● स्वच्छ शहरांच्या यादीत इंदोर आणि सुरत या शहरांना विभागून पहिला क्रमांक मिळाला आहे.
● इंदोर ने सलग सातव्यांदा हा पुरस्कार पटकावला.
● नवी मुंबई हे तिसरे स्वच्छ शहर ठरले आहे.
पहिली दहा स्वच्छ शहरे
1) इंदूर
2) सुरत
3) नवी मुंबई
4) विशाखापटनम
5) भोपाळ
6) विजयवाडा
7) नवी दिल्ली महानगरपालिका परिषद
8) तिरुपती
9) ग्रेटर हैदराबाद
10) पुणे
पहिली दहा स्वच्छ राज्य
1) महाराष्ट्र
2) मध्य प्रदेश
3) छत्तीसगड
4) ओडिशा
5) तेलंगणा
6) आंध्र प्रदेश
7) पंजाब
8) गुजरात
9) उत्तर प्रदेश
10) तमिळनाडू
● महाराष्ट्राने विविध गटातील 12 पुरस्कार पटकावले असून ते सर्वाधिक आहेत ज्यामुळे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
सर्वेक्षण कसे केले जाते?
● सॅनिटेशन सर्वे ऑफ इंडिया तर्फे जगातील सर्वात मोठे शहरी स्वच्छता सर्वेक्षण केले जाते.
● स्वतंत्र यंत्रणेद्वारे ते देशाच्या विविध भागात केले जाते.
● घरोघरी कचरा संकलन कचऱ्याची निर्मिती आणि प्रक्रिया, कचऱ्यावर प्रक्रिया निवासी आणि व्यावसायिक भागातील स्वच्छता, पाण्याच्या संरचनेची स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता,वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हे कचरा मुक्त शहराचे काही ठळक मापदंडे आहेत.
स्वच्छ भारत अभियान
● हा भारताच्या 4,000 हून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरू केलेला राष्ट्रीय पातळीवर अभियान आहे.
● हे अभियान 2 ऑक्टोबर 2014 रोजी राजघाट, नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झाले.