Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

स्वदेशी बनावटीच्या बहु-प्रभावक तसेच बहुउद्देशीय भू- सुरूंगाची यशस्वी चाचणी Successful testing of indigenously developed multi-effector and multi-purpose landmine

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • May 2025
  • स्वदेशी बनावटीच्या बहु-प्रभावक तसेच बहुउद्देशीय भू- सुरूंगाची यशस्वी चाचणी Successful testing of indigenously developed multi-effector and multi-purpose landmine
Successful testing of indigenously developed multi-effector and multi-purpose landmine

● संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाद्वारे स्वदेशी बनावटीच्या बहु-प्रभावक तसेच बहुउद्देशीय भू- दारूगोळा सुरूंगाची (एमआयजीएम) युद्धजन्य प्रमाणीकरण (कमी स्फोटकांसह) चाचणी यशस्वी झाली.
● ही प्रणाली अतिशय प्रगत आहे. विशाखापट्टणमच्या नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेने आणि पुण्याच्या हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी आणि चंदीगडच्या टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी या डीआरडीओ च्या अन्य प्रयोगशाळांच्या सहयोगातून हे                  बहुउद्देशीय विघातक दारूगोळ्यासह भू सुरूंग विकसित केले आहे.
● आधुनिक प्रचंड जहाजे आणि पाणबुड्यांच्या विरोधात भारतीय नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी ‘एमआयजीएम’ची रचना करण्यात आली आहे.
● विशाखापट्टणम येथील भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि हैदराबाद येथील अपोलो मायक्रोसिस्टम्स लिमिटेड या प्रणालीचे उत्पादन भागीदार आहेत.
● या प्रगत प्रणालीमुळे भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षमतांमध्ये आणखी वाढ होणार आहे.
● संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओ चे अध्यक्ष – डॉ. समीर व्ही. कामत

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *