● महिलांचे प्रसूतिपूर्व आणि प्रसूतिपश्चात उत्तम आरोग्य राहणे, गर्भधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक आणि पोषणात्मक घटकांचे योग्य संतुलन राहणे
आवश्यक आहे.
● यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रथम चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करून ‘स्वस्थ जन्म अभियान’ ही मोहीम राबविण्यात येत
आहे.
● गर्भवती महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘फॉग्सी’ आणि राष्ट्रीय आरोग्य मोहीम ‘आयव्हीएचएम’ यांच्याबरोबर प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर आणि कोल्हापूर मध्ये हे
अभियान राबविण्यात येणार आहे.
● हे अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल.



