● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील पुसा येथे भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले.
● केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
● ही परिषद 7 ते 9 ऑगस्ट 2025 दरम्यान नवी दिल्लीतील पुसा कॅम्पसमध्ये, कृषी विज्ञानातील एक द्रष्टे शास्त्रज्ञ आणि अन्न सुरक्षा चळवळीचे प्रणेते प्राध्यापक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आली आहे.
● ‘सदाहरित क्रांती – जैविक समृद्धीकडे वाटचाल’ ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.
● डॉ. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक होते आणि त्यांनी उभारलेल्या कृषी संशोधन प्रणाली आजही प्रभावीपणे कार्यरत आहेत
● ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत एकूण 2170 शास्त्रज्ञांच्या पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांनी 64,000 हून अधिक गावांना भेटी दिल्या आणि 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आहे.