राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (12 फेब्रुवारी 2024) गुजरातमधील टंकारा, येथे महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त 200 व्या जन्मोत्सव – ज्ञान ज्योती पर्व स्मरणोत्सव समारंभाला संबोधित केले.
स्वामी दयानंद सरस्वती (1824-1883)
● जन्म : 12 फेब्रुवारी 1824, टंकारा (गुजरात, काठेवाड)
● मूळ नाव : मूळशंकर करसनदास तिवारी
● गृहत्याग करून संन्यास स्वीकारला व देशभर भटकंती सुरू.
● साधू विरजानंद यांचे शिष्यत्त्व पत्करून तीन वर्षे हिंदू धर्माचा अभ्यास केला.
● 10 एप्रिल 1875 : मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली
● 1877 : लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली.
स्वामी दयानंद सरस्वती यांचे ग्रंथ
● सत्यार्थप्रकाश, संस्कारविधी, गोकरुणानिधी
● स्वामी दयानंदांनी आपल्या धर्माबांधवांना ‘वेदांकडे परत चला’ हा संदेश दिला.
● देशात अनेक ठिकाणी ‘संस्कृत पाठशाळांची’ स्थापना केली.
● लाहोर येथे पाश्चात्य शास्त्रे व संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी ‘इंडियन अॅकॅडमी’ ही संस्था स्थापन केली.
● निधन: 30 ऑक्टोबर 1883