सावित्रीबाई फुले पुणे फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अधिष्ठाता व पुणे येथील प्रो. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोहर गणपत चासकर यांची नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक माहिती
● राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ मनोहर चासकर यांची 17 फेब्रुवारी रोजी कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.
● डॉ. मनोहर चासकर यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करतील, यापैकी जे अगोदर असेल तोपर्यंत, करण्यात आली आहे.