केंद्रीय महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्यासमवेत परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी, सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री, डॉ. तौफिक बिन फवजान अल-रबिया यांच्या सह, सौदी अरेबियात जेद्दाह इथे द्विपक्षीय हज करार 2024 वर स्वाक्षरी केली.
अधिक माहिती
● हज 2024 साठी भारतातून एकूण 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला असून भारतीय हज समितीच्या माध्यमातून जाण्यासाठी यात्रेकरूंच्या 1,40,020 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
● यामुळे 2024 वर्षात हज यात्रेला पहिल्यांदाच जाणार असलेल्या सर्वसाधारण यात्रेकरूंना मोठा फायदा होईल, तर 35,005 यात्रेकरूंना हज समुहाच्या परिचालकांद्वारे हजयात्रा करण्याची परवानगी दिली जाईल.