● भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि महिला संघाची गोलरक्षक सविता पुनिया यांची या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या बलबीर सिंग पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
● भारतीय हॉकीच्या जागतिक विजेतेपदाच्या सुवर्ण महोत्सवाचे आणि भारतीय हॉकीच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधून झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रथमच खेळाडूंना एकूण 12 कोटी रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली.
● या पुरस्कार सोहळ्यात 1975च्या जागतिक विजेत्या पुरुष संघाला हॉकी इंडियाच्या वतीने मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
सविता तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट
● भारताची गोलरक्षक या विशेष सुवर्णमहोत्सवी पुरस्कार सोहळ्यात दुहेरी पारितोषिकाची मानकरी ठरली.
● ऑलिम्पिक संघाचा भाग असलेल्या सविताची या वर्षी सर्वोत्कृष्ट खेळाडूबरोबर सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणूनही निवड करण्यात आली.
● विशेष म्हणजे सविता तिसऱ्यांदा या पुरस्काराची मानकरी ठरली.