Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

हरित हायड्रोजन प्रकल्पांच्या विकासासाठी एनजीईएल चा महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2024
  • January 2024
  • हरित हायड्रोजन प्रकल्पांच्या विकासासाठी एनजीईएल चा महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एनजीईएल) ने दरवर्षी 1 दशलक्ष टन क्षमतेच्या हरित हायड्रोजन आणि अंतर्निहित घटकांच्या (हरित अमोनिया, हरित मिथेनॉल) विकासासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे, ज्यामध्ये 2 गिगावॅट पंप साठवण प्रकल्पांचा आणि राज्यात 5 GW पर्यंत साठवणुकीसह किंवा साठवणुकीव्यतिरिक्त अक्षय ऊर्जा प्रकल्प विकासाचा समावेश आहे.
पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्र सरकारच्या हरित गुंतवणूक योजनेचा एक भाग म्हणून या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

अधिक माहिती
● करारामध्ये अंदाजे 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
● 29 जानेवारी 2024 रोजी एनजीईएल चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित भार्गव आणि राज्य शासनाचे उपसचिव (ऊर्जा), नारायण कराड यांच्यात हा सामंजस्य करार झाला.
● यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
● एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे वर्ष 2032 पर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता निर्मितीचे लक्ष्य आहे.
● एनजीईएल ही एनटीपीसीच्या मालकीची उपकंपनी आहे आणि एनटीपीसी च्या अक्षय ऊर्जा प्रवासाचा ध्वजवाहक बनण्याचे तिचे उद्दिष्ट आहे.
● तिची कार्यान्वयन क्षमता 3.4 गिगावॅट पेक्षा अधिक असून 26 गिगावॅटचे निर्धारित उद्दिष्ट आहे ज्यापैकी 7 गिगावॅटबाबत अंमलबजावणी सुरू आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *