जगातील सर्वांत मोठं कार्यलय असलेल्या ‘सूरत डायमंड बोर्स’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गेल्या काही वर्षांत सूरत हे नवे व्यापारी पेठ म्हणून उदयाला येत आहे. त्यामुळे येथे आता सराफा बाजार केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने सूरत डायमंड बोर्स तयार करण्यात आले आहे.
सुरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग
• हिरे आणि त्यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या व्यापारासाठी हे जगातील सर्वात मोठं आणि आधुनिक केंद्र असेल.
• कच्चे आणि पॉलिश्ड हिरे तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी हे जागतिक केंद्र असेल.
• डायमंड बोर्समध्ये आयात आणि निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस, रिटेल ज्वेलरी व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सिक्योर वॉल्टची सुविधा आहेत.
• ‘सुरत डायमंड बोर्स’ चे संकुल 67 लाख चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रात विस्तारलेले आहेत.