- झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनन यांच्याकडे राजीनामा सादर केला.
- यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन सरकार स्थापनेचा दावा केला असून, ते पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत.
- ‘झामुमो’च्या नेतृत्वाखालील आघाडीमधील घटक पक्षांच्या बैठकीत सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
- सोरेन हे राज्याचे 13 वे मुख्यमंत्री असतील.
- हेमंत सोरेन यांची ‘झामुमो’ विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
- जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणी तुरुंगवास झालेले हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाने जामीन ह मंजूर केल्यानंतर, 28 जून रोजी तब्बल पाच महिन्यांनंतर त्यांची सुटका झाली