- देशातील प्रमुख महानगरांपैकी एक असलेले हैदराबाद हे तेलंगण राज्याच्या निर्मितीनंतर आंध्र प्रदेश व तेलंगण या दोन्ही राज्यांची गेली दहा वर्षे संयुक्त राजधानी होती.
- हा दहा वर्षांचा करार संपुष्टात आला असून आजपासून (ता.2) हैदराबाद केवळ तेलंगणची राजधानी असेल.
- आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, 2014 नुसार हैदराबाद संयुक्त राजधानी करण्यात आली होती.
- आंध्र प्रदेशचे 2014 मध्ये विभाजन करण्यात आल्यानंतर दोन्ही राज्यांसाठी पुढील दहा वर्षे ही एकच राजधानी होती.
- आंध्रचे विभाजन करून 2 जून 2014 मध्ये स्वतंत्र तेलंगण राज्य स्थापन करण्यात आले होते.
- आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यात 2 जून 2014 पासून पुढील दहा वर्षांसाठी तेलंगण व आंध्र प्रदेशची संयुक्त राजधानी असेल, असे नमूद करण्यात आले होते.
- हा कालावधी दहा वर्षांपेक्षा अधिक नसावा. कायद्यातील पोट-कलम (1) मध्ये नमूद केलेला हा कालावधी संपल्यानंतर हैदराबाद ही केवळ तेलंगणची राजधानी असेल आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी नवीन राजधानी असेल, असेही या कायद्यात म्हटले होते.
- सुमारे दशकभरच्या संघर्षानंतर आंध्र प्रदेशमधून स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती – करण्यात आली होती.
- त्यासाठी, फेब्रुवारी 2014 मध्ये आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक संमत झाले होते.