Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

हॉंगकॉंग ठरले जगातील सर्वाधिक महागडे शहर (HONG KONG IS THE MOST EXPENSIVE CITY IN THE WORLD)

  • Home
  • Current Affairs
  • हॉंगकॉंग ठरले जगातील सर्वाधिक महागडे शहर (HONG KONG IS THE MOST EXPENSIVE CITY IN THE WORLD)

मर्सर्स – 2023’ या संस्थेच्या राहणीमानाच्या खर्चाचा तुलनात्मक अभ्यासातून हॉंगकॉंग हे जगातील सर्वाधिक महागडे शहर ठरले आहे . या संस्थेने जगभरातील 227 शहरातील राहणीमानाच्या खर्चाचा अभ्यास केला त्यात भारतातून मुंबई हे देशातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. परदेशातून मायदेशी परतलेल्यांसाठी राहणीमानाचा खर्च या दृष्टीने मुंबई देशातील सर्वात महागडे शहर आहे . याच निकषावर जगात मुंबईचा क्रमांक 147 असून पुणे या यादीत 213 व्या क्रमांकावर आहे . ‘मर्सर्स ‘ने जगभरातील शहरातील 200 वस्तूंच्या दरांचा अभ्यास केला त्यामध्ये घर खरेदी, वाहतूक, अन्नधान्यावर होणारा खर्च, कपडे ,गृहोपयोगी वस्तू आणि मनोरंजनासाठी होणारा खर्च यांचा समावेश होता. सर्व शहरातील दरांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर सर्वाधिक महाग शहरांची यादी तयार करण्यात आली.

जगातील सर्वाधिक महाग शहरे:

  1. हॉंगकॉंग
  2. सिंगापूर
  3. झ्यूरीच

जगातील सर्वात स्वस्त शहरे:

  1. हवाना
  2. कराची
  3. इस्लामाबाद

जगातील महाग शहरात भारतीय शहरांचे स्थान:

शहर                 क्रमांक

मुंबई                 147

नवी दिल्ली      169

चेन्नई              184

बंगळुरू             189

हैदराबाद           202

कोलकाता         211

पुणे                   213

भारतातील पहिली तीन महागडी शहरे:

  1. मुंबई
  2. दिल्ली
  3. बंगळुरू

भारतीय शहरांबाबतची निरीक्षणे:

  • मुंबईच्या तुलनेत पुणे ,चेन्नई, हैदराबाद आणि कोलकत्ता या शहरात घरे 50% कमी दरात उपलब्ध
  • सर्वाधिक स्वस्त घरे कोलकात्यात उपलब्ध
  • जागतिक बहुराष्ट्रीय कंपन्यांना कार्यालये स्थापण्यासाठी मुंबई आणि दिल्ली सर्वाधिक किफायतशीर शहरे
  • आशियातील सर्वाधिक महागड्या 35 शहरात मुंबई आणि दिल्लीचा समावेश
  • सन 2022 मध्ये मुंबई आशियातील महाग शहरांच्या यादीत 28 व्या क्रमांकावर होती.

अहवाल सादर करण्यासाठी मर्सर्सचे महत्वाचे निकष:

सुरक्षितता, शिक्षण, स्वछता, आरोग्य, सेवा, संस्कृती , पर्यावरण, मनोरंजन, राजकीय-आर्थिक स्थिरता, सार्वजनिक वाहतूक आणि वस्तू ते सेवांमध्ये प्रवेश हे महत्वाचे निकष

मर्सर्स:

मर्सर्स शहराच्या जीवनाची गुणवत्ता निर्देशांक ठरवते जी राहणीमानाच्या परिभाषित मापनानुसार रँक केली जाते.

स्वच्छ पाणी ,स्वच्छ हवा, पुरेसे अन्न आणि निवारा या तरतुदींचा विचार करण्याव्यतिरिक्त अनेक निर्देशांक अधिक व्यक्तीनिष्ठ घटक देखील मोजतात ज्यात शहराची समुदायाची भावना निर्माण करण्याची क्षमता असते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *