- हरित क्रांतीचे जनक वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या स्मरणार्थ हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
- कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी मदत करणाऱ्या वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी राज्यात 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत कृषी सप्ताह पाळला जातो.
- भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती “कृषी दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला.
- तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत आहे.