- महाराष्ट्र राज्य शासनाने 11 जुलै 2002 रोजी महसूल दिनाच्या आयोजना संदर्भात पहिले परिपत्रक काढले होते यानंतर दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
- 1 ऑगस्ट महसूल दिन हा दिवस मागे वळून आपल्या कामाचे परिक्षण करण्याचा दिवस आहे . शासनाच्या मध्यवर्ती विभाग म्हणून महसूल विभाग कार्यरत आहे .
- महसूल विभागाने वर्षभर केलेल्या विविध लोकाभिमुख कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट महसूल दिन म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येतो.
मुस्लिम महिला हक्क दिन
- भारतात तिहेरी तलाक विरोधात कायदा अस्तित्वात येण्याच्या वर्धापन दिनानिमित्त 1 ऑगस्ट रोजी मुस्लिम महिला हक्क दिन साजरा केला जातो .
- 2020 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.
पार्श्वभूमी:-
- भारत सरकारने तिहेरी तलाक विरोधात 1 ऑगस्ट 2019 रोजी कायदा केला ज्याद्वारे तिहेरी तलाकच्या सामाजिक कुप्रथेस फौजदारी गुन्हा ठरविण्यात आले .
- 2019 पासून यात मुस्लिम पुरुषांद्वारे त्वरित घटस्फोटाची प्रथा प्रतिबंधित आहे आणि कायद्याचे कोणतेही उल्लंघन केल्यास तीन वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
‘यूपीएससी‘च्या अध्यक्षपदी प्रीती सुदान
- माजी आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- मनोज सोनी यांनी अलिकडेच मुदत पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.
- प्रशासकीय सेवेतील 1983च्या तुकडीच्या सुदान सध्या यूपीएससीच्या सदस्य आहेत.
- याबाबत 29 जुलै रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुदान यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली.
- त्या 1 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारतील.
- 29 एप्रिल 2025 पर्यंत त्यांची नियुक्ती असेल.
UPSC – Unioin Public Service Commision (संघ लोकसेवा आयोग)
- स्थापना : 1 ऑक्टोबर 1926
- मुख्यालय: धोलपूर हाऊस, नवी दिल्ली
- केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोक सेवा आयोग ही भारत संघ राज्याची निवड संस्था आहे.
- ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच संघ सेवेच्या गट ‘अ’ व गट ‘ब’ कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता जबाबदार आहे.
- या संस्थेची सनद भारतीय राज्यघटना, भाग14, अनुच्छेद 315-323 मध्ये दिलेली आहे. त्यास ‘संघ व राज्यातील सेवा’ असे नामकरण आहे.
- हा संवैधानिक आयोग आहे म्हणजेच, हा आयोग भारतीय संविधानातील तरतुदीनुसार स्थापन झाला आहे.
- भारत सरकार संघ सेवेतील(गट ‘अ’ व गट ‘ब’) तसेच अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या नेमणूक, बदली, पदोन्नती व शिस्तीची कारवाई इ. करिता लोक सेवा आयोगाशी सल्लामसलत करते.
- हा आयोग थेट राष्ट्रपतींना अहवाल सादर करतो तसेच, आयोग राष्ट्रपती मार्फत भारत सरकारला सल्ले देऊ शकते पण असे सल्ले बंधनकारक नसतात.
- संवैधानिक संस्था असल्याकारणाने केंद्रीय लोकसेवा आयोग हा भारतीय न्यायव्यवस्था व निवडणूक आयोग ह्याप्रमाणेच स्वायत्त आहे.
- ‘लोकसेवा आयोग’ या नावाने 1ऑक्टोबर 1926 रोजी स्थापना. नंतर “भारत सरकार कायदा, 1935” नुसार ‘फेड्रल संघराज्य लोकसेवा आयोग’ असे नामकरण. आणि शेवटी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘संघ लोकसेवा आयोग’ असे नावबदल.
माजी क्रिकेटपटू गायकवाड यांचे निधन
- क्रिकेटच्या मैदानात परिस्थितीत कितीही विपरीत असली तरी हार न मानणारे भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू-फलंदाज अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले .
- रक्ताच्या कर्करोगामुळे त्यांचं निधन झाले.
- 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करणारे अंशुमन गायकवाड हे सलामीचे फलंदाज होते.
- सुनील गावस्कर यांच्यासह त्यांनी कसोटी सामन्यात सलामी केलेली होती.
- गायकवाड हे भारतीय संघाची प्रशिक्षकही राहिले होते .
- लढवय्या फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती.
- बारा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दोन शतके केलेली आहेत.
- 2018 यावर्षी त्यांना बीसीसीआयकडून सी. के .नायडू जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता.
‘तरंग शक्ती‘ सराव
- देशातील सर्वात मोठा ‘तरंग शक्ती’ हवाई सराव दोन टप्प्यात होणार असून या सरावातून भारताच्या संरक्षण सामर्थ्याचे दर्शन घडणार आहे.
- तमिळनाडूतील सूलूर येथे 6 ते 14 ऑगस्ट या काळात पहिल्या टप्पा होणार असून दुसरा टप्पा राजस्थानातील जोधपूर या ठिकाणी 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात होईल.
- 51 देशांना या सरावासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 30 देशांनी आपला होकार कळवला आहे.



