Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

एसएसएलव्हीचे यशस्वी प्रक्षेपण

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)  आणखी एक झेप घेत लघु उपग्रह यान यान-03  (एसएसएलव्ही-डी3) याचे व  यशस्वी प्रक्षेपण केले.
  • पृथ्वी निरीक्षण उपग्रह (ईओएस- 08) वाहून नेणारे हे यान आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 16 ऑगस्ट सकाळी 17 वाजता अवकाशात झेपावले.
  • यामुळे इस्रोने ‘एसएसएलव्ही’चा तिसरा आणि अंतिम विकासात्मक उड्डाण पूर्ण केले आहे.
  • या यानावरील उपग्रहाचा वापर या यानावरील उपग्रहाचा वापर टेहळणी, आपत्ती व पर्यावरण देखरेख, आग शोधणे, ज्वालामुखीची माहिती यांसारख्या कामांसाठी केला जाणार आहे.
  • या कामगिरीमुळे खासगी उद्योजकांना लघु उपग्रह यान यानाचा वापर करून प्रक्षेपण करण्यासाठी  इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या ‘न्यूस्पेस इंडिया लि. ‘बरोबर सहयोग करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • प्रक्षेपणानंतर 10 ते 12 मिनिटांतच ईओएस-08 उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपकापासून वेगळा झाला. त्यानंतर काहीच वेळात ‘स्पेस किड्झ इंडिया’ने विकसित केलेला 200 ग्रॅम वजनाचा एसआर-ओ डेमोस्टेंट उपग्रहही वेगळा झाला, त्यातून ही मोहीम यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले.
  • प्रक्षेपणानंतर काही वेळातच ईओएस-08 उपग्रह अचूकपणे कक्षेत पोहोचला.
  • ‘एसएसएलव्ही’ चे पहिले प्रक्षेपण ऑगस्ट 2022मध्ये झाले होते. मात्र, त्यावेळी संशोधकांना अपेक्षित परिणाम मिळाला नव्हता.
  • त्यानंतर फेब्रुवारी 2023 मधील उड्डाण यशस्वी झाले होते.

 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

  • देशातील सर्वोच्च मानाचे पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये  ‘अट्टम’ या मल्याळम चित्रपटाने बाजी मारली आहे.
  • सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या सुवर्णकमळ पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट संकलन आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी विभागून अशा तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर ‘अट्टम’ने नाव कोरले आहे.
  • 2022 या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीत करण्यात आली.
  • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या चित्रपट विभाग परीक्षक समितीचे अध्यक्ष राहुल रवैल, चित्रपटेतर विभाग परीक्षक समितीचे अध्यक्ष नील माधब पांडा आणि चित्रपटविषयी उत्कृष्ट लेखन विभागाच्या परीक्षक समितीचे अध्यक्ष गंगाधर मुदलियार यांच्या वतीने विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.
  • राष्ट्रीय “चित्रपट पुरस्कारांचे मानकरी  ठरलेल्या विजेत्यांची यादी परीक्षकांनी रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्रालयाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हाती सुपूर्द केली.

पुरस्कार विजेते:

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – अट्टम (मल्याळम)
  • सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – कांतारा
  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – ऋषभ शेट्टी(कांतारा)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नित्या मेनन(तिरुचित्रंबलम), मानसी पारेख (कच्छ एक्सप्रेस)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन मल्होत्रा(फौजा)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता(उंचाई)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण – फौजा(प्रमोद कुमार)
  • सर्वोत्कृष्ट लघुपट – झुन्योटा
  • सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट – द कोकोनट ट्री
  • सर्वोत्कृष्ट माहितीपट – मुरमर्स ऑफ द जंगल
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुरज बडजात्या(उंचाई)
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – ए. आर.रेहमान, प्रीतम
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अरजितसिंग
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सौदी वेलाक्का, बॉम्बे जयश्री
  • पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार –1954

थायलंडच्या पंतप्रधानपदी शिनावात्रा

  • थायलंडच्या संसदेने पेतोंगतार्न शिनावात्रा यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड केली आहे.
  • पेतोंगतार्न या 37 वर्षांच्या असून त्या थायलंडच्या सर्वांत तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत.
  • शिनावात्रा कुटुंबातील पंतप्रधान होणाऱ्या त्या तिसऱ्या व्यक्ती आहेत.
  • पेतोंगतार्न या सत्ताधारी फ्यु थाईपार्टीच्या नेत्या आहेत. मात्र, त्या संसदेत निवडून आलेल्या नाहीत. मात्र, पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी ही अट नसल्याने त्यांनी अर्ज भरला होता.
  • स्त्रेथ्था थाविसीन यांनी गुन्ह्याचा आरोप असलेल्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिल्याने नैतिक कारणांवरून दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाने त्यांची पदावरून हकालपट्टी झाली होती.त्यामुळे सत्ताधारी पक्षातून दुसऱ्या नेत्याची या पदावर निवड करणे भाग होते.
  • या पदासाठी पेतोंगतार्न यांचाच एकटीचा अर्ज दाखल झाल्याने त्यांनाच बहुतांश मते मिळाली.

 पेतोंगतार्न यांच्या कुटुंबाची राजकीय वाटचाल:

  • पेतोंगतार्न या थायलंडचे माजी पंतप्रधान ठकसीन शिनावात्रा यांच्या कन्या आहेत.
  • त्यांची आत्या यिंगलुक शिनावात्रा यादेखील देशाच्या पंतप्रधान होत्या.
  • ठकसीन हे थायलंडचे लोकप्रिय पंतप्रधान होते.
  • मात्र, 2006 मध्ये लष्करी बंड होऊन त्यांना विजनवासात जावे लागले होते.तरीही पक्षावर त्यांचे नियंत्रण कायम होते.
  • 2011 मध्ये झालेल्या निवडणुकीत ठकसीन यांची बहिण यिंगलुक शिनावात्रा या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.
  • मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांच्याविरोधात मोठे जनआंदोलन होऊन 2014 मध्ये त्यांनाही पद सोडावे लागले होते.
  • ठकसीन हे विजनवासातून नुकतेच मायदेशी परतले असून यिंगलुक अद्यापही देशाबाहेरच आहेत.

साल्सेंग सी मराक यांचे  निधन

  • मेघालयचे माजी मुख्यमंत्री साल्सेंग सी मराक  यांचे वयाच्या 82 व्या वर्षी  वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले.
  • काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले मराक हे सन 1993मध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले.
  • 1998 मध्ये युती तुटल्यावर त्यांनी सर्वात कमी काळ म्हणजे 12 दिवस मुख्यमंत्रिपद भूषविले होते.

17 वी आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिंपियाड

  • चीनमध्ये बीजिंग येथे 08-16 ऑगस्ट 2024 दरम्यान झालेल्या 17 व्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिंपियाड मध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाने अनेक प्रतिष्ठित पदके प्राप्त केली.
  • चार सदस्यीय भारतीय संघामध्ये गुजरात, केरळ, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
  • या विद्यार्थ्यांनी तीन स्पर्धा श्रेणींमध्ये (लेखी आणि प्रात्यक्षिक, पृथ्वी प्रणाली प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय टीम फील्ड इन्व्हेस्टिगेशन) प्रत्येकी तीन सुवर्ण आणि कांस्य आणि दोन रौप्य पदके जिंकली आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *