साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर
- लोकसाहित्यआणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक संशोधक डॉक्टर तारा भवाळकर यांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
- साहित्यसंमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत.
- याआधी कुसुमावती देशपांडे, ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत, ज्येष्ठ कवियत्री शांता शेळके, ज्येष्ठ लेखिका प्राध्यापक विजया राज्याध्यक्ष आणि प्रसिद्ध कवियत्री अरुणा ढेरे यांनी यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
- पुण्यातीलसरहद्द संस्थेतर्फे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे.
- संयुक्तमहाराष्ट्राची निर्मिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच राजधानी दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली.
- यापूर्वीदिल्लीमध्ये 70 वर्षांपूर्वी साहित्य संमेलन झाले होते त्यावेळी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी अध्यक्षपद भूषवले होते.
तारा भवाळकर यांच्याविषयी
- ताराभवाळकर यांचा जन्म 1 एप्रिल 1939 रोजी पुणे या ठिकाणी झाला .
- त्यांनीलोकसंस्कृतीची ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर रा. चिं. ढेरे यांच्या समवेत संशोधनाचे काम केले आहे.
- लोसंस्कृती, नाट्यशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन ,लोककला याविषयी तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले आहे .
- पौराणिकनाटके, लोकनाट्य, दशावतार तंजावरचे नाटके, यक्षगान, कथकली आणि नाट्यप्रकारांची जडणघडण शोधून त्यांनी चिकित्सक दृष्टीने सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तूपाठच घालून देणारे लेखन केले आहे.
- मराठीविश्वकोश मराठी वाङ्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही सहभाग घेतला आहे
- इस्लामपूरजागर साहित्य संमेलन, उचगाव बेळगाव महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलन, कारदगा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलन, अलिबाग अवास कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले महिला साहित्य संमेलन, जळगाव साहित्य संमेलन, इस्लामपूर राजारामबापू ज्ञान प्रबोधनी साहित्य संमेलन, पुणे येथे 5 जानेवारी 2019 रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे.
- लोकसंचितग्रंथासाठी राज्याचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार त्यांना मिळाला होता.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि.मा. गोखले पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
- ग्रंथसंपदा:राणीसाहेब रुसल्या, मधुशाला, यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा, प्रियतमा, लोकनागर रंगभूमी, माहामाया, मिथक आणि नाटक, लोकसंचित लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा ,स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, माझीये जातीच्या ,मराठी नाट्यपरंपरा: शोध आणि आस्वाद ,आचार्य जावडेकर पत्रे आणि संस्मरणे, लोकसाहित्य वाङ्मय प्रवाह, मराठी नाटक: नव्या दिशा नवी वळणे, मायवाटेचा मागोवा, तिसऱ्या बिंदूच्या शोधात ,लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा, पायवाटेची रंगरूप (आत्मकथनपर लेखन संग्रह) लोकसाहित्याचा अभ्यास दिशा, मनातले जनात ,निरगाठ सुरगाठ, मातीची रूपे, मरणात खरोखर जग जगते
ज्येष्ठ कथक नृत्यगुरू डॉ. सुजाता नातू यांचे निधन
- ज्येष्ठकथक नृत्यगुरू डॉ. सुजाता सुरेश नातू यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.
- डॉ. सुजातानातू यांचा जन्म बडोदा येथे झाला.
- महाराजासयाजीराव विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात बी. ए आणि संगीत विषयात उच्च शिक्षण घेतले.
- टिळकमहाराष्ट्र विद्यापीठातून राज्यशास्त्रामध्ये एम. ए. पूर्ण केले.
- एसएनडीटीविद्यापीठातून पीएच. डी. संपादन केली.
- वयाच्यानवव्या वर्षापासून जयपूर घराण्याचे गुरु पंडित सुंदरलाल आणि पंडित कुंदनलाल यांच्याकडे त्यांनी कथक नृत्य शिक्षण घेतले.
- पंडितजवाहरलाल नेहरू ,डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ,इंदिरा गांधी यांच्यासह विविध मान्यवरांसमोर त्यांनी एकल नृत्य सादरीकरण केले होते.
- विवाहनंतरमुंबईत त्यांनी ‘पदण्यास’ या नृत्यसंस्थेची स्थापना केली.
- यासंस्थेच्या माध्यमातून गेल्या पन्नास वर्षात अनेक मुलींना कथक प्रशिक्षण दिले असून अनेक रंगमंचचे कार्यक्रम सादर केले .
- अनेकशाळांमध्ये नृत्य हा एक वेगळा विषय म्हणून विभाग सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
- टिळकमहाराष्ट्र विद्यापीठात कथक नृत्यासाठी पदविका, पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रात नृत्य विषयक अभ्यासक्रम आखण्यात त्यांचा सहभाग होता.
- विद्यापीठाकडूनप्राध्यापिका म्हणून देखील त्यांची नियुक्ती झाली होती.
- त्यांचाउल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्यासाठी पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या हस्ते त्यांना ‘पंडिता ‘ही पदवी प्रदान करण्यात आली होती .
- टिळकमहाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी बहाल केली.



