Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

11 एप्रिल – महात्मा ज्योतिबा फुले जयंती (1827 ते 1890)

  • Home
  • Current Affairs
  • 11 एप्रिल – महात्मा ज्योतिबा फुले जयंती (1827 ते 1890)
  • जन्म : 11 एप्रिल 1827, पुणे
  • मुळ गाव : कटगुण जिल्हा : सातारा
  • मूळ आडनाव : गोऱ्हे
  • वडिलांचे नाव : गोविंदराव
  • आईचे नाव : चिमनाबाई
  • 1840 या वर्षी खंडूजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी वयाच्या 13 व्या वर्षी विवाह.
  • निधन : 28 नोव्हेंबर 1890

कार्य:

  • महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजकार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्री शिक्षणास प्राधान्य दिले.
  • 1848 या वर्षी त्यांनी पुणे येथील बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
  • 1851 यावर्षी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली.
  • अस्पृश्यांच्या मुलांसाठी त्यांनी नाना पेठेत आणि वेताळ पेठेत देखील शाळा सुरू केली होती.
  • महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग या ठिकाणी  मेजर कँडी च्या हस्ते त्यांचा 1852 मध्ये सत्कार केला होता.
  • 1863 या वर्षी बाल हत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
  • 1868 – स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला
  • 1873 – समाजातील सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्याचा उद्देशाने सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

महात्मा फुले यांचे साहित्य:

  • तृतीय रत्न, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्य धर्म, अस्पृश्यांची कैफियत, खतफोडीचे बंड, सत्यशोधक समाज.
  • महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या ‘राइट्स ऑफ मॅन’ व ‘कॉमन सेन्स’ या ग्रंथांचा विशेष प्रभाव होता.
  • शालेय जीवनात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर छत्रपती ‘शिवाजी महाराज’ व ‘जॉर्ज वॉशिंग्टन’ यांच्या चरित्रांचा प्रभाव होता.
  • 1876 ते 1882 या काळात महात्मा ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते.
  • महात्मा ज्योतिबा फुले यांना ‘हिंदुस्तानचे बुकर टी वॉशिंग्टन’ तसेच ‘महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग’ असे संबोधले जाते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *