जी – 20 परिषद : 2024
- जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांचा महत्त्वपूर्ण गट असलेल्या ‘जी-20’ गटाची शिखर परिषद रिओ द जानेरोमध्ये सुरू झाली.
- ब्राझीलचे अध्यक्ष लुइझ इनाशिओ लुला डिसिल्वा यांनी परिषदेला सुरुवात करताना गरिबी, भूक आणि हवामान बदलासारख्या संकटांचा सामना करण्याचे आवाहन केले.
- डिसिल्वा यांनी परिषदेसाठी आगमन झालेल्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले.
- मोदी यांच्यासह अमेरिकेचे मावळते अध्यक्ष ज्यो बायडेन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन, ब्रिटन चे पंतप्रधान किर स्तार्मर इत्यादी महत्त्वाचे नेते या परिषदेसाठी दाखल झाली आहेत.
भारतीय लष्कराकडून केपांग ला दिन साजरा
- भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यात गेलिंग येथे केपांग दिवस साजरा केला.
- भारतीय लष्कराच्या स्फिअर कोअरने 1962 च्या भारत-चीन युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना आदरांजली वाहिली तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याला उजाळा देण्यात आला.
- भारत आणि तिबेट सीमेवरील केपांग ला (खिंड) ही सामरिकदृष्ट्या महत्त्वाची असून 1962 च्या भारत-चीन युद्धात सियांग खोऱ्यात गेलिंग येथील ग्रामस्थांनी भारतीय लष्कराला मदत केली होती.
- या कारणांमुळेच केपांग ला ही भारतीय लष्कर आणि ग्रामस्थांच्या बलिदानाचे प्रतिक आहे.
- दरवर्षी भारतीय लष्कराकडून केपांग ला येथे बलिदान देणाऱ्या जवानांच्या स्मारणार्थ केपांग दिवस साजरा करण्यात येतो.
- चीनच्या युद्धात भारतीय लष्करासमवेत खंबीरपणे उभे राहिलेल्या ग्रामस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवस साजरा केला जातो आणि याहीवेळी रविवारी (17 नोव्हेंबर.)साजरा करण्यात आला.
- याप्रसंगी ग्रामस्थांच्या शौयगाथेची आठवण करण्यात आली.
- सियांग खोऱ्यातील केपांग खिंड ही भारतीय शौर्याचे प्रतीक आहे. या वेळी लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. तसेच लष्कर आणि ग्रामस्थ यांच्या अनोख्या संबंधांचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक गेलिंग मठात प्रार्थना म्हणण्यात आली.
काय घडले होते ?
- 1962 मध्ये सियांग खोऱ्यात गावकऱ्यांनी आणि भारतीय लष्करांनी अतुलनीय धाडस दाखविले.
- गेलिंगच्या ग्रामस्थांनी न्योगोंग नदीजवळ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांच्या पावलाचे ठसे पाहिले.
- गावकऱ्यांची सूचना मिळताच भारतीय लष्कर सजग झाले.
- या वेळी चीनच्या सैनिकांशी झालेल्या धुमश्चक्रीत आठ भारतीय जवानांना वीरमरण आले.
- यात दोन मद्रास रेजिमेंटचे सुभेदार शेख सुबानी, हवालदार बी. रामलिंगा जी, शिपाई मुरी राजा, अप्पा राव आणि इलियास यांचा समावेश होता.
अमेरिकेत सर्वाधिक भारतीय विद्यार्थ्यांची नोंद
- अमेरिकेत सर्वाधिक विदेशी विद्यार्थी पाठवणारा देश म्हणून भारत गेल्या 15 वर्षांत प्रथमच समोर आला आहे.
- अमेरिकेच्या शिक्षण संस्थांमध्ये सध्या 3 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिकत आहेत.
- प्रसिद्ध झालेल्या ‘ओपन डोअर्स अहवाल 2024’द्वारे ही माहिती अधोरेखित करण्यात आली.
■ दोन वर्षांची तुलना
- शैक्षणिक वर्ष 2022-23मध्ये अमेरिकेत विदेशी विद्यार्थी पाठवण्यात चीन पहिल्या क्रमांकावर होता, तर भारत दुसऱ्या स्थानी.
- सध्याच्या ‘ओपन डोअर्स अहवाला’ नुसार शैक्षणिक वर्ष 2023-24मध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने उच्चांकी म्हणजे 3 लाख 31 हजार 602 राहिली.
- वर्ष 2022 – 23 च्या तुलनेत यात 23 टक्क्यांनी वाढ.
- या वर्षात ही संख्या 2 लाख 68 हजार 923 इतकी होती.
अहवालातील ठळक घडामोडी
- भारत आता अमेरिकेत सर्वाधिक विदेशी विद्यार्थी पाठवणारा देश
- अमेरिकेत शिकणाऱ्या एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी 29 टक्के विद्यार्थी भारतातील
- शैक्षणिक वर्ष 2023- 24 मध्ये अमेरिकेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पाठवणाऱ्या पहिल्या पाच देशांमध्ये भारताशिवाय, चीन, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि तैवान यांचा समावेश.
- भारत सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकेत सर्वाधिक विदेशी पदवीधर पाठविणारा देशही ठरला.
अहवालाचा हेतू
- हा अहवाल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन ने प्रसिद्ध केला असून अमेरिकेतील विदेशी विद्यार्थ्यांचे वार्षिक सर्वेक्षण करते.
- आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि शैक्षणिक आदान प्रदानाच्या फायद्यावर प्रकाश टाकण्याचा या संस्थेचा उद्देश आहे.
हदोती बुंदी उत्सव
- राजस्थानातील कोटा शहरात तीन दिवसांच्या हदोती बुंदी वार्षिक उत्सवाला प्रारंभ झाला. यात सजविलेल्या उंटाची शहर परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.
- 1995 साली लोकसहभागातून हा महोत्सव सुरू झाला. त्याची रूपरेषा 1995 मध्ये तयार करण्यात आली आणि 1996 मध्ये पहिला बुंदी उत्सव आयोजित करण्यात आला.
- या उत्सवाशी सर्वसामान्यांना जोडण्यासाठी तत्कालीन बुंदीचे जिल्हाधिकारी मधुकर गुप्ता यांनी पुढाकार घेतला होता.
- वर्षानुवर्षे, राजस्थानच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेतील सर्वात उत्सुकतेने अपेक्षित असलेल्या घटनांपैकी एक बनून, या सणाला लोकप्रियता प्राप्त झाली आहे.
- रंगीबेरंगी मिरवणुका बुंदीच्या रस्त्यावरून जातात, ज्यात पारंपारिक पोशाख आणि सामानांनी सजवलेले उंट, घोडे आणि हत्ती असतात. या मिरवणुका राजस्थानचा शाही वारसा दर्शवतात आणि उत्सवाच्या वातावरणात भर घालतात. याची सुरुवात बुंदी शहरातील तारागड किल्ल्यावर गणपतीच्या पूजेने होते.
महत्व:
- बुंदी उत्सव पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रदेशात सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
- हे स्थानिक कलाकार आणि कारागीरांना त्यांची कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते, ज्यामुळे पारंपारिक कला प्रकारांचे जतन आणि प्रोत्साहन होते. शिवाय, हा सण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो, बुंदी आणि आसपासच्या क्षेत्राच्या आर्थिक विकासात योगदान देतो.
जागतिक शौचालय दिन
- जागतिक शौचालय दिन हा 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
- जागतिक शौचालय दिन हा जागतिक स्वच्छता संकटाचा सामना करण्यासाठी प्रेरणादायी कृती करण्यासाठी साजरा केला जातो.
- या दिवसाचा उद्देश शौचालयाची योग्यपद्धतीने स्वच्छता करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे हा आहे.
- या दिवशी आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि स्वच्छतेच्या नियमांना प्रोत्साहन दिले जाते.
- जागतिक शौचालय संघटनेने 2001 मध्ये या दिवसाची स्थापना केली होती.
- संयुक्त राष्ट्र महासभेने 2013 मध्ये या दिवसाला अधिकृतपणे जागतिक शौचालय दिन म्हणून नियुक्त केले.
- दरवर्षी, UN-Water या संयुक्त राष्ट्रांच्या पाणी आणि स्वच्छताविषयक समन्वय यंत्रणेने जागतिक शौचालय दिनाची थीम निश्चित करते.
2024 मध्ये जागतिक शौचालय दिनाची थीम ‘शांततेसाठी स्वच्छता‘ आहे.



