जगामध्ये बालकांना कामगार म्हणून राबविले जाऊ नये आणि बालकांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळालाच पाहिजे हा जागतिक बालकामगार विरोधी दिनामागचा मुख्य उद्देश आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 12 जून 2002 रोजी केली. बाल कामगारांच्या जागतिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणे आणि बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे या उद्देशाने जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात येतो.
थीम:
“बालमजुरी विरुद्ध कारवाईचा सप्ताह”
इतिहास:
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही संयुक्त राष्ट्रांची शाखा आहे. ही संघटना कामगार आणि कामगारांच्या हक्कांसाठी नियम बनवते, त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला यासाठी अनेक वेळा पुरस्कारही देण्यात आला आहे.



