Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

13 फेब्रुवारी: राष्ट्रीय महिला दिन

भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे.

अधिक माहिती
● सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला.
● त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले.
● 12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला.
● भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे.
● सरोजिनी नायडू 1914 साली पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटल्या. महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्या त्यावेळी त्या गांधीजींच्या विचारांनी अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांची विचारसरणी पुर्णपणे बदलुन गेली. त्यानंतर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.
● 1925 साली त्या कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनल्या.
● 1928 साली ब्रिटीश सरकारने त्यांना प्लेगच्या साथीदरम्यान त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल ‘कैसर ए हिंद’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
● 2 मार्च, 1949 रोजी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
● कवयित्री सरोजिनी नायडू यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधत 13 फेब्रुवारी 2014 सालापासून देशात राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *