- भारत सरकारच्या नौवहन महासंचालनालया अंतर्गत, नॅशनल मेरिटाइम डे सेलिब्रेशन (केंद्रीय) समिती (NMDC), अर्थात राष्ट्रीय नौवहन दिवस समारंभ समितीने 25 जून 2024 रोजी मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ’14 वा नाविक दिवस’ साजरा केला.
- आंतरराष्ट्रीय नौवहन संघटनेने (IMO) यंदाच्या नाविक दिनाच्या कार्यक्रमासाठी, ‘नॅव्हिगेटिंग द फ्युचर: सेफ्टी फर्स्ट’ म्हणजेच, भविष्याची दिशा ठरवताना: सुरक्षा सर्वप्रथम”, ही संकल्पना ‘सेफ्टी टिप्स ॲट सी’ अर्थात ‘सागरी सुरक्षेसाठीच्या सूचना’, या मोहिमेचा हॅशटॅग म्हणून स्वीकारली होती.
- केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपल्या संदेशात, भारतीय खलाशांनी पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी दिलेल्या मोठ्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्याचा विशेष उल्लेख केला.
- बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी के रामचंद्र यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात भारत सरकारने खलाशांच्या फायद्यासाठी केलेल्या कामाची माहिती दिली आणि सध्याच्या परिस्थितीत सुरक्षितता आणि संरक्षणाचे महत्त्व सांगितले.
- नॅशनल मेरिटाइम डे सेलीब्रेशनच्या (NMDC) 61 व्या वर्षानिमित्त या समारंभात नौवहन उद्योगावरील तपशीलवार स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
- डीजी नौवहनच्या अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले.
- यामध्ये खलाशांसाठी सुरक्षितता सुनिश्चित करणे, नाविकांचे अधिकार, सुरक्षिततेसाठी संपर्क आणि अपघाताचे विश्लेषण आणि खलाशांचे प्रमाण 12% वरून 20% पर्यंत वाढवण्याची रणनीती, या आणि इतर मुद्द्यांचा यात समावेश होता.