गेल्या काही वर्षात जगभरातील विजेचा वापर सातत्याने वाढत चालला असून याचे आपल्या जीवनावर बरेच वाईट परिणाम होतांना दिसून आले आणि त्याबद्दलच जागृकता वाढवण्यासाठी 14 डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ साजरा केला जातो. याबाबतीत लोकांना जागृत करणे हा या दिवसाचा मूळ उद्देश आहे.
• ऊर्जा संवर्धन म्हणजे ऊर्जेचा वापर कमी करून ऊर्जेची बचत करणे आहे.
• राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण राष्ट्रात विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात.
• यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, सार्वजनिक सभा आणि ऊर्जा संवर्धनाबाबत जागृकता वाढवण्यासाठी अशाप्रकारचे अनेक उपक्रम घेतले जातात.
● भारत सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी द्वारे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन आयोजित केला जातो.
● BEE ही ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन क्षेत्रात भारत सरकारची नोडल एजन्सी आहे.
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचा इतिहास
● ऊर्जा संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या उद्योग आणि संस्थांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 1991 मध्ये एक योजना सुरू केली.
● हे पुरस्कार नामवंत व्यक्तींकडून दिले जातात. 2002 मध्ये, ऊर्जा संरक्षण कायदा 2001 लागू करण्यासाठी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी (BEE) नावाचे वैधानिक मंडळ स्थापन करण्यात आले. गेल्या ऊर्जा संवर्धन दिनी सरकारने ‘ईव्ही यात्रा’ पोर्टल आणि मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले.
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे उद्दिष्ट
● राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना ऊर्जेचा योग्य वापर करण्याचे महत्त्व समजणे आणि ऊर्जा संवर्धनाप्रती समर्पण वाढवणे.