15 जानेवारी हा भारतासाठी महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस दरवर्षी भारतीय सेना दिन (Indian Army Day ) म्हणून साजरा केला जातो. 2024 मध्ये 76 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. 15 जानेवारी हा दिवस सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि भारताचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. नवी दिल्ली आणि सर्व लष्करी मुख्यालयात 15 जानेवारी रोजी लष्करी परेड, लष्करी प्रदर्शन आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातात.
15 जानेवारीलाच का साजरा केला जातो?
● वास्तविक भारतीय सेना दिन फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.
● फील्ड मार्शल केएम करिअप्पा कोण आहेत आणि त्यांच्या सैन्यातील योगदानाबद्दल तसेच 15 जानेवारीला आर्मी डे का साजरा केला जातो हे जाणून घेऊया..
● देश स्वतंत्र होण्यापूर्वी लष्करावर ब्रिटिश सेनापतीचा ताबा होता.
● सन 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय लष्कराचे नेतृत्व ब्रिटिश वंशाच्या व्यक्तीकडे होते.
● 1949 मध्ये स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर होते. त्यांची जागा भारतीय लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा यांनी घेतली.
● ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते. विशेष म्हणजे त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते. पुढे करिअप्पाही फील्ड मार्शल बनले.
● वास्तविक फील्ड मार्शल केएम करिअप्पा हे 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख झाले.
● भारताच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची घटना आहे. म्हणूनच दरवर्षी 15 जानेवारी हा भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो.
● करिअप्पा लष्करप्रमुख झाले तेव्हा भारतीय सैन्यात सुमारे 2 लाख सैनिक होते. करिअप्पा 1953 मध्ये निवृत्त झाले आणि 1993 मध्ये वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
● करिअप्पा यांचे कर्तृत्व करीअप्पा यांनी 1947 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे नेतृत्व केले.
● निवृत्तीनंतर त्यांना 1986 मध्ये फील्ड मार्शल पद देण्यात आले.
● याशिवाय दुसऱ्या महायुद्धात बर्मामध्ये जपान्यांना पराभूत केल्याबद्दल त्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायरचा सन्मानही मिळाला होता.