देशाला वैयक्तिक प्रकारात पहिले ऑलिंपिक पदक जिंकून देणारे खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन आता राज्य क्रीडादिन म्हणून साजरा होणार आहे.
अधिक माहिती
● या राज्य क्रीडादिनाच्या कार्यक्रमांसाठी प्रत्येक जिल्ह्याला 75 हजार रुपये, तर राष्ट्रीय क्रीडादिनासाठी आता 50 हजार आणि क्रीडा सप्ताहासाठी 10 हजारांऐवजी 1 लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे.
● पुणे येथील शिवछत्रपती पुरस्कार वितरण समारंभात 28 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
● हा क्रीडा दिन क्रीडा व युवक संचलनालय, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकुले, प्राथमिक, माध्यमिक शाळा ,कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय, शासकीय तसेच खाजगी विद्यापीठ, क्रीडा संस्था, मंडळे अकादमी ,क्रीडा योजनांचा लाभ घेणाऱ्या संस्थांमध्ये साजरा केला जाणार आहे.
● खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यान, क्रीडा रॅली, मॅरेथॉन, मार्गदर्शन शीबिर, खेळाडूशी संवाद ,क्रीडा पुरस्काराचे वितरण, राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा उपक्रमांचे आयोजन यामध्ये करण्यात येणार आहे.