- नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे “पवन-ऊर्जा: भारताच्या भविष्याला बळ” या मध्यवर्ती संकल्पनेसह 15 जून 2024 रोजी ‘जागतिक पवन दिन ” आयोजित केला होता.
- भारतीय पवन क्षेत्राचे आतापर्यंतचे गौरवशाली यश साजरे करणे आणि भारतात पवन ऊर्जेच्या वापराला गती देण्याच्या संभाव्य उपायांवर चर्चा करणे, हा यामागचा उद्देश आहे.
- पवन ऊर्जेची क्षमता आणि महत्त्व साजरे करण्यासाठी जगभरातील लोक एकत्र येतात. हा दिवस लोकांना पवन ऊर्जेबद्दल आणि ऊर्जा प्रणालींमध्ये परिवर्तन करण्याची, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, नोकऱ्या निर्माण करण्याच्या आणि वाढीला चालना देण्याच्या संभाव्यतेबद्दल शिक्षित करण्यासाठी समर्पित आहे.
- युरोपियन विंड एनर्जी असोसिएशन (EWEA) द्वारे 2007 मध्ये पहिला पवन दिवस साजरा करण्यात आला.