देशाला पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवून देणाऱ्या स्व. खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्म दिवस हा आता ‘महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जात आहे, यासाठी शासनाच्या वतीने खास शासननिर्णय जाहीर करण्यात आला.
हा दिन साजरा करून आता देशासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या खाशाबा यांच्या कार्याचा गौरव होणार आहे.
अधिक माहिती
● यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने अथक प्रयत्न करण्यात आले. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच शासनानला हा महत्वाचा निर्णय जाहीर करावा लागला.
● महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या कराड येथील खाशाबा जाधव यांनी 1952 हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्तीत पहिले पदक (कांस्य) पटकावले होते.
● हे भारताचे वैयक्तिक गटातील पहिले ऑलिम्पिक पदक ठरले.
● यामुळे भारतीय संघाच्या नावे पदकाचा बहुमान नोंदवला गेला.
● खाशाबा जाधव यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशाला हा मोठा बहुमान मिळाला. यामुळे 15 जानेवारी हा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्म दिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होत आहे.