प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी डिसेंबर महिना हा अभिमानाचा आणि गौरवाचा आहे. भारतीय लष्कराने 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी लष्कराला नमवत पाकिस्तानचा पराभव केला. या युद्धामुळे बांग्लादेशची निर्मिती झाली. 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी भरतापूढे शरणागती पत्करली होती. बांगला मुक्ती वाहिनीला मदत करतांना भारताने 16 डिसेंबर, 1971 रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो.
● 16 डिसेंबर 2023 या वर्षी या घटनेला 52 वर्ष पूर्ण झाले.
● हे युद्ध 3 डिसेंबर, 1971 ला सुरू होऊन 16 डिसेंबर, 1971 ला संपले.
● ऑपरेशन चंगेज खान अंतर्गत पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
● यानंतर भारतीय लष्कराने वेगवान हल्ला करत केवळ 14 दिवसांत पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करत बांग्लादेशची निर्मिती केली.
● जगात आतापर्यंत झालेल्या युद्धात एवढ्या कमी दिवसात तब्बल 93 हजार सैनिकांनी आत्मसमर्पण करण्याची ही पहिलीच वेळ होती.
● 16 डिसेंबर 1971 ला भारताचा विजय झाला. हाच दिवस आज आपण विजय दिवस म्हणून साजरा करत आहोत.