Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

18 एप्रिल – दिनविशेष :

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या 165 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा खालीलप्रमाणे:

महर्षी धोंडो केशव कर्वे (1858 – 1962)

 जन्म : 18 एप्रिल 1858 मुरुड, शेरवली (जिल्हा : रत्नागिरी)

विवाह : राधाबाई (1873)

शैक्षणिक पार्श्वभूमी

1880 :  मुंबईत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण

1884 : एल्फिन्स्टंट महाविद्यालयामधून गणित विषयात बीए ची पदवी प्राप्त

1891 ते 1914 या काळात पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक

पुनर्विवाह

1891 : पत्नी राधाबाई यांचे निधन

1893 : गोदुबाई यांच्याशी पुनर्विवाह

गोदुबाईंना आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या नावाने ओळखले जात

महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या विविध संस्था :

1893 : विधवा विवाहोत्तेजक मंडळ

1899 : अनाथ बालिकाश्रम

1907: महिला विद्यालय

1910: निष्काम कर्ममठ

1916: महिला विद्यापीठ ( 1949: SNDT – श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी)

1936 : ग्राम प्राथमिक शिक्षक मंडळ

1944 : समता संघ

महर्षी कर्वे यांना मिळालेल्या पदव्या :

1942 – बनारस विद्यापीठ (डी. लिट.)

1951- पुणे विद्यापीठ (डी. लिट

1954 – SNDT महिला विद्यापीठ (डी. लिट)

1957 या वर्षी मुंबई विद्यापीठाने महर्षी कर्वे यांना L.L .D ही पदवी दिली

पुरस्कार :

महर्षी कर्वे यांना पद्मविभूषण(1955) आणि भारतरत्न(1958) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्र  :

आत्मवृत्त (मराठी -1928)

हेच 1936 या वर्षी इंग्रजी भाषेत ‘लुकिंग बॅक’ नावाने प्रकाशित

1972 यावर्षी वसंत कानेटकर लिखित ‘हिमालयाची सावली’ हे नाटक महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित आहे

 

निधन :  9 नोव्हेंबर 1962 ,पुणे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *