दरवर्षी, 19 ऑगस्ट रोजी, जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे छायाचित्र आणि त्याच्या इतिहासाचा जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो.
इतिहास:-
1837 मध्ये फ्रेंच कलाकार आणि छायाचित्रकार लुईस-जॅक-मँडे दागैर यांनी सर्व प्रथम डग्युरोटाइपचा शोध याच दिवशी लावला होता. डग्युरोटाइप म्हणजे आयोडीन-संवेदनशील सिल्व्हर प्लेट आणि पारा वाष्प वापरून सुरुवातीच्या फोटोग्राफिक प्रक्रियेद्वारे घेतलेले छायाचित्र. या शोधाची तारीख 19 ऑगस्ट आहे. लुईस-जॅक-मँडे दागैर यांची छायाचित्रणाची ही कल्पना फ्रेंच अकादमी ऑफ सायन्सेस यांनी विकत घेतली, जी जगासाठी महत्त्वाची ठरली, तो दिवस 19 ऑगस्ट 1839 हा होता. त्यामुळेच या दिवशी जगातीक छायाचित्रणाचा दिवस साजरा करण्यात येतो. असे असले तरी जागतिक छायाचित्रण दिवस साजरा करण्यात यावा अशी कल्पना १९९१ पर्यंत कुठेही अस्तित्त्वात नव्हती, याचे श्रेय भारतीय छायाचित्रकार ओपी शर्मा यांच्याकडे जाते.जागतिक छायाचित्रण दिनाची थीम ” लँडस्केप्स ” 2010 या वर्षापासून नियोजितपणे हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.


