ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेत बेनोनी येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघावर 79 धावांनी दमदार विजय मिळवत तब्बल 14 वर्षांनंतर विश्वाविजेपद पटकावले. याआधी त्यांनी 2010 मध्ये न्यूझीलंड येथे झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली होती. भारतीय संघाला 2020 नंतर या स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या संघाने या स्पर्धेचे चार वेळा विजेतेपद पटकावले (1988, 2002, 2010, 2024). भारताने चार वेळा उपविजेतेपद मिळवले. (2006, 2016, 2020, 2024)
अधिक माहिती
● विजेता: ऑस्ट्रेलिया
● उपविजेता: भारत
● ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार: ह्यू वेबगे
● भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार: उदय सहारण
● स्पर्धा : 15 वी
● ठिकाण : दक्षिण आफ्रिका
● अंतिम सामना : बेनोनी
● सहभागी संघ : 16
● सामनावीर : माहली बिअर्डमॅन (ऑस्ट्रेलिया)
● मालिकावीर : क्वेना माफाका – द. आफ्रिका (21 बळी)
● सर्वाधिक धावा : उदय सहारण – भारत (397 धावा)
● आगामी स्पर्धा : 2026 – (झिम्बाब्वे, नामेबिया)
● पहिली स्पर्धा : 1988(ऑस्ट्रेलिया)
● सर्वाधिक वेळा विजेतेपद – भारत (5 वेळा – 2000, 2008, 2012, 2018, 2022)