दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ दिन (World Wetlands Day) साजरा केला जातो.
2024 सालची संकल्पना
● ‘पाणथळ जागा आणि मानवी कल्याण ‘ अशी आहे. ही 2024 च्या जागतिक पाणथळ दिनाची संकल्पना आहे.
● आपले जीवन सुधारण्यात पाणथळ जागांची महत्त्वाची भूमिका, ही संकल्पना अधोरेखित करते.
● पूर संरक्षण, स्वच्छ पाणी, जैवविविधता आणि मनोरंजनाच्या संधी या मानवी आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या बाबींमधील पाणथळ जागांचे योगदान यातून अधोरेखित होते.
अधिक माहिती
● केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांनी पाणथळ जागा संवर्धनासाठी संपूर्ण समाज दृष्टिकोनावर संरचित ‘सेव्ह वेटलैंड्स मोहीमे’ची या दिनी सुरुवात केली.
● ‘रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स’ म्हणजे रामसर करारावर 2 फेब्रुवारी 1071 रोजी स्वाक्षरी केल्याच्या स्मरणार्थ जागतिक पाणथळ दिन जगभरात साजरा केला जातो.
● भारत 1982 पासून या कराराचा सदस्य आहे.
● आशियातील रामसर साइट्सचे सर्वात मोठे नेटवर्क भारतात आहे.