Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

20 फेब्रुवारी : जागतिक सामाजिक न्याय दिन

संयुक्त राष्ट्रांनी 2007 मध्ये एक ठराव मंजूर केला होता. त्या ठरावाप्रमाणे दरवर्षी 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा करण्याची घोषणा देखील करण्यात आली. ही घोषणा झाल्यानंतर तब्बल 2 वर्षांनंतर 2009 मध्ये पहिल्यांदाच जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.

अधिक माहिती
● जागतिक सामाजिक न्याय दिन यशस्वीपणे साजरा करण्यासाठी अनेक देश एकत्र येतात.
● एकत्र येऊन जातीभेद, लिंगभेद, बेरोजगारी, गरिबी आणि धर्माच्या नावाखाली विभागलेल्या लोकांना एकत्रितपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात.
● भारतात लोकांना समान अधिकार देण्याचा कायदा आहे. यासाठी भारतीय राज्यघटनेत सामाजिक विषमता दूर करण्यासाठी अनेक तरतूदींचा समावेश करण्यात आला आहे.

महत्व
● सध्याच्या आधुनिक काळात जागतिक सामाजिक न्याय दिनाचे महत्व अधिक वाढले आहे. आपण सर्वजण एक आहोत आणि आपल्यातील भेदभाव किंवा कोणतीही विषमता दूर करण्यासाठी समाजात जागृती निर्माण करणे महत्वाचे आहे. तसेच, या गोष्टी होता कामा नयेत, यासाठी आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
● भारत देशातील सरकार अनेक योजना राबवत आहे. या अंतर्गत जनतेला समान अधिकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून सर्व समाजाचा एकत्रितपणे विकास होण्यास मदत होईल.
● 2024 च्या जागतिक सामाजिक न्याय दिनाची थीम – ” ब्रिजिंग गॅप्स, बिल्डिंग अलायन्स “. जगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्य आणि भागीदारीच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ही थीम निवडली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *