जागतिक हवामान संस्थेने प्रसिध्द केलेल्या ‘स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट 2022’ अहवालात 2022 हे पाचवे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नमूद केले.
अहवालात नमूद करण्यात आलेली काही महत्वाची निरीक्षणे:
2015 या वर्षापासून आठ वर्षे ही आजपर्यंत सर्वाधिक उष्णतेची
2021 मध्ये कार्बनडाय ऑक्साड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साड या तीन मुख्य हरितगृह वायूंचे प्रमाण विक्रमी उच्चांकावर
सन 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तानात पूर्व मान्सून काळ हा अत्यंत उष्ण होता
पाकिस्तानात सर्वाधिक उष्ण महिने मार्च आणि एप्रिल हे त्याच वर्षी नोंदले गेले .या दोन्ही महिन्यात राष्ट्रीय सरासरी तापमान दीर्घकालीन सरासरी तापमानाच्या चार अंश सेल्सिअसहुन अधिक होते
जागतिक हवामानशास्त्र संस्था(WMO – World Meteorological)
स्थापना : 23 मार्च 1950
अध्यक्ष : गेरहर्ड एड्रियन(जर्मनी)
मुख्यालय : जिनिव्हा