Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Month: September 2024

तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन

तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन

शिगेरू इशिबा जपानच्या पंतप्रधानपदी निवड जपानमधीलसत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने शिगेरू इशिबा यांची  पंतप्रधानपदासाठी निवड केली. याआठवड्यात ते जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतील. शिगेरूइशिबा संरक्षण धोरणातील तज्ज्ञ असलेले इशिबा जपानचे माजी संरक्षणमंत्री आहेत. त्यांनी’नाटो’च्या धर्तीवर आशियामध्ये लष्करी आघाडीची  संकल्पना मांडली आहे. तैवानमध्येलोकशाहीचे ते समर्थक आहेत. इशिबायांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत  जपानच्या आर्थिक सुरक्षा मंत्री सानाई तातकाईची यांच्यावर मात केली. मावळतेते पंतप्रधान फुमिओ कीशीदा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे पायउतार व्हावे लागले आहे .  संरक्षणतज्ञ ते पंतप्रधान...

Read More
रोहिदास पाटील यांचे निधन

रोहिदास पाटील यांचे निधन

रोहिदास पाटील यांचे निधन ●खान्देशचे नेते व माजी मंत्री रोहिदास (दाजीसाहेब) चुडामण पाटील यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन...

Read More
हिंद महासागर रिम संघटनेच्या परिसंवादाचे दुसरे पर्व

हिंद महासागर रिम संघटनेच्या परिसंवादाचे दुसरे पर्व

27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन जगभरातीलपर्यटनाचे महत्त्व आणि त्याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रभाव ओळखून दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. भविष्यातीलपिढ्यांसाठी अधिक शाश्वत आणि न्याय्य पर्यटन उद्योगाला चालना देण्याचा या दिवसाचा उद्देश आहे. यावर्षी, जागतिक पर्यटन दिन, पर्यटन आणि जागतिक शांतता यांच्यातील संबंधावर लक्ष केंद्रित करते, संयुक्त राष्ट्रांनी विविध संस्कृती समजून घेण्याचे आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जागतिकपर्यटन दिनाची थीम :”पर्यटन आणि शांतता“ इतिहास जागतिकपर्यटन दिन 1970 मध्ये UNWTO च्या कायद्यांचा अवलंब केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीयसहकार्याला चालना देण्यासाठी आणि प्रवासी आणि यजमान समुदाय दोघांनाही लाभ देणाऱ्या शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी पर्यटनाच्या भूमिकेवर जोर देण्यासाठी जगभरातील देश परिषदा, प्रदर्शने आणि सामुदायिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त असतात. पर्यटनाच्याफायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि कार्यशाळा यासह विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जातो....

Read More
सुरेशकुमार मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

सुरेशकुमार मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

शक्तिशाली देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आशियातालशक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले. केंद्रसरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही माहिती  दिली. भारताच्यावाढत्या विकास दराबाबत ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने 27 देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना या क्रमवारीमध्ये भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असल्याचे जाहीर केले. बाह्यआक्रमणासह सर्वप्रकारची संकटे दूर ठेवण्याची एखाद्या देशाची क्षमता कितपत आहे, या निकषाच्या आधारे एशिया पॉवर इंडेक्समध्ये प्रभावी देशांची क्रमवारी ठरविली जाते. कोरोनाच्याजागतिक साथीनंतर भारताचा आर्थिक विकास वेगाने झाला. अर्थव्यवस्थेचा विस्तार त्याचप्रमाणे  लोकांच्या संख्येत वाढ या कारणांनी भारताची स्थिती मजबूत झाल्याने आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात देशाची कामगिरी सुधारली यामुळे जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका आगामी काळात आणखीन महत्त्वाची होऊ शकते. गेल्यावर्षीतिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानला भारताने मागे टाकले. यायादीत अमेरिका सर्वोच्च स्थानी असून चीनचा दुसरा क्रमांक आहे त्यानंतर भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशिया अशी क्रमवारी आहे. सुरेशकुमार मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश  मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे नवीन प्रमुख न्यायाधीश म्हणून सुरेश कुमार कैत यांनी शपथ घेतली. मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी राजभवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात कैत यांना शपथ दिली. कैतयांनी यापूर्वी तेलंगण, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे....

Read More
श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी हरिणी अमरसूर्या

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी हरिणी अमरसूर्या

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी हरिणी अमरसूर्या श्रीलंकेचेनवे अध्यक्ष अनुरा दिसनायके  यांनी देशाच्या पंतप्रधानपदावर हरिणी अमरसूर्या यांची नियुक्ती केली आहे. यापदावर नियुक्ती झालेल्या त्या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला आहेत. याआधीसिरिमाओ भंडारनायके,चंद्रिका कुमारतुंगा,श्रीलंकेच्या महिला पंतप्रधान होत्या. अमरसूर्याया नॅशनल  पीपल्स पॉवर पक्षाच्या नेत्या आहेत. खातेवाटपातत्यांच्याकडे न्याय, शिक्षण, कामगार, उद्योग, आरोग्य आणि गुंतवणूक अशी महत्त्वाची  खाती आली आहेत. अमरसूर्या यांच्याविषयी उजव्याविचारांच्या कार्यकर्त्या विद्यापीठातप्राध्यापक शैक्षणिकआणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत कार्यरत दिल्लीतीलहिंदू कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण ऑस्ट्रेलियातउपयोजित मानववंशशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण सामाजिकमानववंशशास्त्र विषयात एडिंबरा विद्यापीठातून पीएच.डी. 37व्या अखिल भारतीय टपाल बुद्धिबळ स्पर्धा-2024 महाराष्ट्रआणि गोवा परिमंडळ टपाल क्रीडा मंडळ 37 व्या अखिल भारतीय टपाल बुद्धिबळ स्पर्धा-2024...

Read More
पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव

पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव

पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव लोहगावयेथील विमानतळाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला . राज्यसरकारने मान्यता दिलेला हा प्रस्ताव आता केंद्राकडे जाणार असून तेथे अंतिम मान्यता मिळाल्यानंतर विमानतळाला हे नाव दिले जाणार आहे . पुण्यातीललोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव द्यावे असा प्रस्ताव केंद्रीय...

Read More
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णयश

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णयश

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णयश भारताच्यापुरुष आणि महिला बुद्धिबळ संघांनी  इतिहास रचला. दोन्हीसंघांनी अफलातून कामगिरी करून 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णयश मिळवले. अंतिमफेरीत भारताच्या पुरुष संघाने स्लोव्हेनियावर, तर महिला संघाने अझरबैजान संघावर मात केली. भारताच्यापुरुष संघाने यापूर्वी 2014 आणि 2022च्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. भारताच्यामहिला संघाने चेन्नईत झालेल्या 2022मधील स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. करोनाकाळात 2020 आणि 2021मधील स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. यात पुरुष आणि महिला संघ एकत्रित करण्यात आले होते.त्यात 2022मधील स्पर्धेत भारतीय संघ रशियासह संयुक्त विजेता ठरला होता. बुद्धिबळऑलिम्पियाडमध्ये एकाच वेळी दोन्ही स्पर्धा जिंकणारा भारत हा केवळ सातवा संघ ठरला आहे. एकाचऑलिम्पियाडमध्ये दोन्ही सांघिक स्पर्धा जिंकण्याचा प्रसंग 2018 नंतर प्रथमच घडला. 2018 मध्येचीनने हे यश मिळवले होते. भारताचापुरुष संघ: आर....

Read More
'एनआरएआय'च्या अध्यक्षपदी कलिकेश सिंह यांची निवड

‘एनआरएआय’च्या अध्यक्षपदी कलिकेश सिंह यांची निवड

एअरमार्शल अमर प्रीत सिंग नवीन हवाई दलप्रमुख एअरमार्शल अमर प्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाचे नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. ते28 वे हवाईदल प्रमुख असतील. एअरमार्शल सिंग यांनी पाच हजारांपेक्षा जास्त काळ उड्डाणांचा अनुभव आहे. सिंग सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यमानहवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चौधरी 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. 27 ऑक्टोबर1964 रोजी जन्मलेले एअर मार्शल सिंग यांना  डिसेंबर 1984 मध्ये भारतीय हवाई दलाच्या ‘फायटर पायलट  स्ट्रीम’मध्ये नियुक्त करण्यात आले होते. सुमारे40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत  त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडेविविध ई प्रकारच्या विमानांच्या पाच हजारहून अधिक तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. तसेच ‘ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि ‘फ्रंटलाइन एअर – बेस’चे त्यांनी नेतृत्व केले आहे. ‘टेस्ट पायलट’ म्हणून त्यांनी मॉस्कोमध्ये ‘मिग-29’ गटाचे नेतृत्व केले होते....

Read More
राष्ट्रीय चित्रपट दिन

राष्ट्रीय चित्रपट दिन

राष्ट्रीय चित्रपट दिन कोरोनाकालावधीनंतर लोकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी 2022 मध्ये राष्ट्रीय चित्रपट दिन सुरू करण्यात आला. आतात्याची तिसरी आवृत्ती 20 सप्टेंबर रोजी साजरी होत आहे. मल्टिप्लेक्सअसोसिएशन ऑफ इंडियाने यावर्षी राष्ट्रीय चित्रपट दिनाची तारीख म्हणून 20 सप्टेंबर निश्चित केली आहे. याचित्रपटा दिनानिमित्त देशभरातील चित्रपटगृहांमध्ये सिनेमाप्रेमींसाठी केवळ 99रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध केली जाणार आहे. पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, मूव्ही टाइम आणि डिलाइटसह चार हजारांहून अधिक स्क्रीनवर चित्रपट दाखवले जाणार आहेत. 2023 यावर्षी 13 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात आला होता.

Read More