Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Day: September 11, 2024

इंडस-एक्स (INDUS-X) शिखर परिषद

इंडस-एक्स (INDUS-X) शिखर परिषद

इंडस–एक्स (INDUS-X) शिखर परिषद तिसरीइंडस-एक्स शिखर परिषद अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे संपन्न झाली. भारतआणि अमेरिका दरम्यानच्या संयुक्त संरक्षण नवोन्मेषिक परिसंस्थेच्या वाटचालीतील प्रगतीचे ते द्योतक होते. 9-10 सप्टेंबर2024 रोजी अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंच (युएसआयएसपीएफ) आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाने संयुक्तपणे आयोजित केलेली ही शिखर परिषद म्हणजे एक ऐतिहासिक कार्यक्रम होता. भारत-अमेरिकासंरक्षण प्रवेग इकोसिस्टम (INDUS-X) परिषदेची थीम :  “सीमा संरक्षण इनोव्हेशन इकोसिस्टम वाढविण्यासाठी गुंतवणूकीच्या संधींचा उपयोग” याशिखर परिषदेदरम्यान, संरक्षण विषयक नावीन्यपूर्ण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी आणि उद्योग, संशोधन आणि गुंतवणूक भागीदारी सुलभ करण्यात सहयोग वाढवण्यासाठी आयडेक्स आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागांतर्गत असलेल्या संरक्षण नवोन्मेष युनिट  यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शिखरपरिषदेच्या अन्य प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये इंडस-एक्स अंतर्गत नवीन आव्हानाची घोषणा, इंडस-एक्स प्रभाव अहवालाचे प्रकाशन आणि आयडेक्स आणि डीआययु संकेतस्थळावर अधिकृत इंडस-एक्स वेबपृष्ठाचे अनावरण यांचा समावेश होता. हीशिखर परिषद स्टार्टअप्स/एमएसएमई द्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या संयुक्त प्रदर्शनासाठी एक मंच प्रदान करते. इंडस-एक्सअंतर्गत वरिष्ठ सल्लागार गट आणि वरिष्ठ धुरिण मंच या दोन सल्लागार मंचांद्वारे महत्वपूर्ण विचारमंथन देखील ही परिषद सक्षम करते. भविष्यातीलतंत्रज्ञानाचा कल, स्टार्टअप्सची क्षमता बांधणी, संरक्षण नवकल्पनांसाठी निधीची संधी आणि संरक्षण पुरवठा साखळी मजबूत करण्यावर परिषदेत चर्चा  झाली....

Read More