भारत-ओमान संयुक्त लष्करी सराव
भारत–ओमान संयुक्त लष्करी सराव भारत-ओमानसंयुक्त लष्करी सराव अल नजाहच्या पाचव्या फेरीसाठी भारतीय सैन्य दल ओमानला रवाना हा सराव 13 ते 26 सप्टेंबर 2024 दरम्यान सलालाह, ओमान येथील रबकूट प्रशिक्षण विभाग येथे होणार आहे. अलनजाह हा सराव 2015 पासून भारत आणि ओमान दरम्यान दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो. यासरावाची यापूर्वीची सराव फेरी राजस्थानमधील महाजन येथे आयोजित करण्यात आली होती. 60 कर्मचाऱ्यांचासमावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या बटालियनसह इतर शस्त्रास्त्रे आणि सेवा यामधील कर्मचाऱ्यांनी केले आहे. ओमानच्यारॉयल आर्मीमध्येही 60 जवानांचा समावेश असून, ते फ्रंटियर फोर्सच्या तुकड्यांचे प्रतिनिधित्व करतील. उद्दिष्ट: संयुक्तराष्ट्रांच्या चार्टरच्या VII व्या कारवाईअंतर्गत दहशतवादविरोधी कारवाया करण्यासाठी दोन्ही बाजूंची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हे या संयुक्त सरावाचे उद्दिष्ट आहे. वाळवंटातीलवातावरणात कशा पध्दतीने काम करावे यावर हा सराव लक्ष केंद्रित करेल. यासरावाच्या दरम्यान होणाऱ्या सामरिक कवायतींमध्ये जॉइंट प्लॅनिंग,...
Read More