‘पोर्ट ब्लेअर’ चे नाव आता ‘श्री विजयपुरम’
‘पोर्ट ब्लेअर’ चे नाव आता ‘श्री विजयपुरम’ स्वातंत्र्यवीरसावरकर यांनी जिथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या अंदमान – निकोबार द्वीपसमुहातील प्रमुख शहर ‘पोर्ट ब्लेअर’चे नाव बदलून ते ‘श्री विजयपुरम’ करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. देशालागुलामीच्या सर्व प्रतिकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पाने प्रेरित होऊन गृह मंत्रालयाने ‘पोर्ट ब्लेअर’चे नाव बदलून ते ‘श्री विजयपुरम’ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1789 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्चीबाल्ड ब्लेअरच्या सन्मानार्थ पोर्ट ब्लेअरचे नाव देण्यात आले. जे आता ‘श्री विजया पुरम’मध्ये बदलले आहे.
Read More