Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Day: September 15, 2024

क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी संरक्षणसंशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ 18 एप्रिल 2024 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी श्रेणी (आय टी आर ), चांदीपूर इथून स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची (आयटीसीएम ) यशस्वी उड्डाण चाचणी केली. चाचणीदरम्यान,  सर्वउद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य करण्यात आली. रडार, इलेक्ट्रोऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम (EOTS) आणि आयटीआर द्वारे वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेल्या टेलीमेट्री सारख्या अनेक रेंज सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्राच्या कामगिरीचे परीक्षण करण्यात आले,ज्यामुळे उड्डाण मार्गाचा संपूर्ण माग घेता आला. तसेचभारतीय हवाई दलाच्या सुखोई (Su-30-Mk-I)विमानातूनही क्षेपणास्त्राच्या उड्डाणावर लक्ष ठेवण्यात आले. क्षेपणास्त्रानेवे पॉइंट नेव्हिगेशनचा (दिशादर्शन)  वापर करून इच्छित मार्गाचा अवलंब केला आणि अत्यंत कमी उंचीवरील समुद्र-स्किमिंग उड्डाणाचे प्रात्यक्षिक केले. यायशस्वी उड्डाण चाचणीने बेंगळुरू येथील गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने,विकसित केलेल्या स्वदेशी प्रणोदन प्रणालीची विश्वसनीय कामगिरीदेखील सिद्ध केली आहे. अधिकउत्तम आणि विश्वसनीय कामगिरी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक वैमानिकी तंत्रे आणि सॉफ्टवेअर यांनी देखील सुसज्ज  केले आहे. बेंगळूरूस्थितडीआरडीओ प्रयोगशाळेतील वैमानिकी विकास आस्थापनेने (एडीई) इतर प्रयोगशाळा तसेच भारतीय उद्योगांच्या योगदानासह हे क्षेपणास्त्र विकसित केले

Read More