पुरुष एकेरीत सिन्नर विजेता
पुरुष एकेरीत सिन्नर विजेता जागतिकक्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या इटलीच्या यानिक सिन्नरने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला सरळ सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. सिन्नेरनेअंतिम सामन्यात फ्रिट्झवर 6-3, 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. इटलीच्यायानिक सिन्नरने प्रथमच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सिन्नरच्याकारकिर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम विजेते ठरले आहेत. यापूर्वीत्याने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते. यानिकसिनर व अरीना सबलेंका या दोन खेळाडूंनी यावर्षी ऑस्ट्रेलियन व अमेरिकन या दोन हार्ड कोर्टवरील ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. टेनिसकारकिर्दीतील पहिले दोन ग्रँडस्लॅम विजेतेपद एकाच वर्षी पटकावणारा यानिक सिन्नर हा जिमी कॉर्नर्स (1974) व गिर्लेमो विलास (1977) यांच्यानंतरचा तिसराच पुरुष टेनिसपटू ठरला आहे. यानिकसिन्नर हा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकाविणारा इटलीचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी2015 मध्ये फ्लाविया पेनेट्टाने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. खुल्यायुगात (1968 नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास व जिमी कॉनर्स ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी 5...
Read More