● 2016 मध्ये स्थापनेपासून प्रथमच, आयुर्वेद दिन दरवर्षी एका निश्चित तारखेला म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.
● याबाबतची अधिसूचना भारत सरकारने मार्च 2025 मध्ये जारी केली होती. यापूर्वी, आयुर्वेद दिन धन्वंतरी जयंतीला (धनत्रयोदशी) साजरा केला जात होता.
● निश्चित तारीख ठरवण्याच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे आयुर्वेदाला एक सार्वत्रिक दिनदर्शिकेवर विशेष ओळख मिळाली असून जागतिक स्तरावर अधिक सहभागाला प्रोत्साहन मिळणार आहे.
● या वर्षीच्या उत्सवाची संकल्पना – “लोकांसाठी आणि वसुंधरेसाठी आयुर्वेद”



